Varun Chakaravarthy Record : वरुण चक्रवर्तीचा मोठा पराक्रम! कुलदीप यादवला मागे टाकत टी-२० मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच फिरकीपटू
Varun Chakaravarthy Record : कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) या 'मिस्ट्री स्पिनर'ने केवळ विकेट्स घेतले नाहीत, तर टी-२० क्रिकेटमध्ये एक मोठा भारतीय विक्रमही आपल्या नावावर केला.

Varun Chakaravarthy 200 T20 Wickets Record : ईडन गार्डन्सवर पार पडलेल्या आयपीएल २०२६ च्या २८ व्या सामन्यात वरुण चक्रवर्ती याच्या फिरकीची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळाली. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सच्या (KKR) या ‘मिस्ट्री स्पिनर’ने केवळ विकेट्स घेतले नाहीत, तर टी-२० क्रिकेटमध्ये एक मोठा भारतीय विक्रमही आपल्या नावावर केला. तो काय आहे? जाणून घेऊया.
मिस्ट्री स्पिनर’ने रचला इतिहास –
राजस्थान रॉयल्सने कोलकाताविरुद्धच्या डावात धडाकेबाज सुरुवात केली होती. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल यांनी ८ षटकांत ७९ धावा कुटून केकेआरच्या गोलंदाजांना हतबल केले होते. मात्र, ९ व्या षटकात चेंडू वरुण चक्रवर्तीच्या हातात आला आणि सामन्याचे चित्र पालटले. वरुणने आपल्या पहिल्याच षटकात धोकादायक वैभव सूर्यवंशीला बाद करून कोलकात्याला पहिले यश मिळवून दिले. या विकेटसोबतच वरुण चक्रवर्ती टी-२० क्रिकेटमध्ये २०० विकेट्स घेणारा सर्वात वेगवान भारतीय फिरकीपटू ठरला आहे.
कुलदीप आणि शमीला पछाडले –
I am soooo soooo happy for Varun Chakaravarthy ..
He was never finished tbh .. 🙏 pic.twitter.com/S6JRt6f1XP
— Rishikaaaaa 🌙 (@Pjmjjkfor1) April 19, 2026
वरुण चक्रवर्तीने अवघ्या १५५ सामन्यांत २०० विकेट्सचा टप्पा गाठला. या बाबतीत त्याने कुलदीप यादव (१६० सामने) आणि मोहम्मद शमी (१६५ सामने) यांना मागे टाकले आहे. सर्व भारतीय गोलंदाजांचा विचार केल्यास, तो अर्शदीप सिंग (१५१ सामने) यांच्यानंतर दुसऱ्या स्थानावर आहे. टी-२० मध्ये २०० विकेट्स घेणारा वरुण हा २० वा भारतीय गोलंदाज आणि १० वा भारतीय फिरकीपटू ठरला आहे.
असा रचला चक्रव्यूह –
वरुणने वैभव सूर्यवंशीला एका क्लासिक फ्लाईटेड चेंडूवर जाळ्यात ओढले. वैभवने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू हवेत उडाला आणि रमणदीप सिंगने उत्कृष्ट झेल टिपला. वरुण इथेच थांबला नाही; त्याने आपल्या ४ षटकांच्या स्पेलमध्ये केवळ १४ धावा देत ३ महत्त्वाचे विकेट्स घेतले. यात रियान पराग आणि यशस्वी जैस्वाल यांसारख्या मोठ्या विकेट्सचा समावेश होता. सुरुवातीच्या तीन सामन्यांत एकही विकेट न मिळालेल्या वरुणने आता जबरदस्त पुनरागमन केले आहे.





