Varun Chakaravarthy : फिरकीचा जादूगर वरुण ठरला नंबर-१! बुमराहला मागे टाकत कोणालाच न जमलेला केला पराक्रम

Varun Chakaravarthy broke Jasprit Bumrah Record : भारतीय फिरकीपटू वरुण चक्रवर्ती सध्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या फिरकीची जादू दाखवत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे वरुणने आयसीसी गोलंदाजी क्रमवारीत केवळ अव्वल स्थानच राखले नाही, तर आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम ८१८ रेटिंग पॉइंट्स मिळवले आहेत. यासह त्याने जसप्रीत बुमराहला मागे टाकण्याचाही पराक्रम केला आहे.
वरुणने बुमराहला टाकले मागे –
वरुण चक्रवर्तीने या रेटिंगसह भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा विक्रम मोडला आहे. बुमराहने २०१७ मध्ये ७८३ रेटिंग पॉइंट्स मिळवले होते, जे आतापर्यंत कोणत्याही भारतीय गोलंदाजासाठी सर्वोत्तम होते. आता ८१८ पॉइंट्ससह वरुण हा टी-२० इतिहासातील कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
‘ऑल टाईम’ टॉप-१० मध्ये एन्ट्री –
A career-best rating for a key India spinner as the side primes for their #T20WorldCup defence 👊
More 👇https://t.co/M4Wjtlg3LT
— ICC (@ICC) December 17, 2025
यासोबतच त्याने ‘ऑल टाईम बेस्ट रेटिंग’च्या जागतिक यादीत ८ व्या स्थानावर झेप घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या तीन सामन्यांत वरुणने ६ विकेट्स घेतले. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडच्या जॅकब डफी (६९९ रेटिंग) आणि वरुण यांच्यात आता ११९ रेटिंग पॉइंट्सचे मोठे अंतर आहे.
हेही वाचा – CSK Full Squad : IPL 2026 साठी CSK ची युवा सेना सज्ज! अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर ओतला पैसा, पाहा संपूर्ण संघ
अर्शदीप आणि तिलक वर्माची झेप –
गोलंदाजी क्रमवारीत अर्शदीप सिंगला चार स्थानांचा फायदा झाला असून तो १६ व्या क्रमांकावर पोहोचला आहे. फलंदाजी क्रमवारीत अभिषेक शर्मा ९०९ रेटिंगसह पहिल्या स्थानावर कायम आहे, तर तिलक वर्माने दोन स्थानांची झेप घेत चौथे स्थान पटकावले आहे. दुर्दैवाने, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवची घसरण झाली असून तो १० व्या क्रमांकावर फेकला गेला आहे.
हेही वाचा – Prithvi Shaw : पृथ्वी शॉचे आयपीएल लिलावात हार्टब्रेक ते होमकमिंग: इन्स्टा स्टोरीने घेतला असा यू-टर्न!
ऑलराउंडर रँकिंगमध्ये शिवम दुबेची प्रगती –
पाकिस्तानचा सॅम अयुब अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. भारताच्या शिवम दुबेने दोन स्थानांची सुधारणा करत १६ वे स्थान गाठले आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकाला केवळ दोन महिने उरले असताना, वरुण चक्रवर्तीचा हा फॉर्म भारतासाठी विजेतेपद राखण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.





