CSK Full Squad : IPL 2026 साठी CSK ची युवा सेना सज्ज! अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर ओतला पैसा, पाहा संपूर्ण संघ

Chennai Super Kings Full Squad ahead IPL 2026 : महेंद्र सिंग धोनी आता चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार नसला तरी, संघात त्याची उपस्थिती महत्त्वाची आहे. पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएल २०२६ साठी चेन्नई सुपर किंग्सचा संघ तयार झाला असून, त्यांनी या मिनी ऑक्शनमध्ये अनेक मोठे खेळाडू आपल्या ताफ्यात सामील केले आहेत. यंदा सीएसकेने भारतीय अनकॅप्ड खेळाडूंवर मोठी रक्कम खर्च केली आहे.
सीएसकेने अनकॅप्ड खेळाडूंवर लावली मोठी बोली –
यावेळी चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायझी वेगळ्या रणनीतीसह लिलावात उतरली होती. संघाने अनकॅप्ड खेळाडू कार्तिक शर्मा आणि प्रशांत वीर यांच्यावर मोठी बोली लावली. या दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी १४ कोटी २० लाख रुपये देऊन सीएसकेने खरेदी केले आहे. याशिवाय, वेस्ट इंडीजचा स्टार फिरकीपटू अकील हुसेन याला २ कोटी रुपयांना विकत घेतले.
The super crew! 🙌💛#WhistlePodu #IPLAuction pic.twitter.com/VLqzIXeFaT
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) December 16, 2025
ट्रेडद्वारे सीएसकेने यापूर्वीच राजस्थान रॉयल्सकडून संजू सॅमसनला आपल्या संघात घेतले आहे, तर रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांना राजस्थानकडे पाठवले आहे. या आगामी हंगामात ऋतुराज गायकवाडचं संघाची धुरा सांभाळणार असल्याची घोषणा सीएसकेने आधीच केली आहे.
हेही वाचा – KKR Squad IPL 2026 : केकेआरची धमाकेदार खरेदी! ग्रीन-पथिरानावर ४३ कोटी उधळले, पाहा संपूर्ण संघ
सीएसकेने यंदाच्या लिलावात खरेदी केलेले खेळाडू :
-
अकील हुसेन (२ कोटी)
-
प्रशांत वीर (१४.२० कोटी)
-
कार्तिक शर्मा (१४.२० कोटी)
-
मॅथ्यू शॉर्ट (१.५ कोटी)
-
अमन खान (४० लाख)
-
सरफराज खान (७५ लाख)
-
मॅट हेन्री (२ कोटी)
-
राहुल चाहर (५.२० कोटी)
-
जॅक फाउल्क्स (७५ लाख)
पाच वेळा विजेतेपद आणि धोनीची भूमिका –
पाच वेळा आयपीएलचा किताब जिंकणाऱ्या सीएसकेसाठी मागील काही वर्षे फारशी चांगली राहिली नाहीत. त्यामुळे संघ आता युवा आणि भारतीय खेळाडूंवर अधिक विश्वास दाखवत आहे. एमएस धोनी यावर्षीही संघात दिसणार आहे. त्याची नेमकी भूमिका काय असेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल, पण यंदाचा संघ पाहता सीएसके चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे.
रिटेन केलेले महत्त्वाचे खेळाडू : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, डेवॉल्ड ब्रेविस, एमएस धोनी, शिवम दुबे, जेमी ओवरटन, नूर अहमद, खलील अहमद, संजू सॅमसन (ट्रेड).
रिलीज केलेले महत्त्वाचे खेळाडू : मथीशा पथिराना, डेव्हॉन कॉनवे, रचिन रवींद्र, रवींद्र जडेजा (ट्रेड), सॅम करन (ट्रेड).





