Rivaba Jadeja : ‘परदेश दौऱ्यांवर भारतीय क्रिकेटर्स गैरकृत्यांमध्ये सामील होतात…!’, जडेजाच्या पत्नीचा खळबळजनक खुलासा

जडेजाच्या पत्नीचे वादग्रस्त वक्तव्य –
या व्हिडिओमध्ये रिवाबाने तिचा पती रवींद्र जडेजाच्या सचोटीचे आणि शिस्तीचे कौतुक केले. ती म्हणाली की, “जडेजा नेहमी नकारात्मक प्रभावापासून दूर राहिले आणि त्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांचे भान ठेवले. जडेजा लंडन, दुबई किंवा ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये खेळायला जातात, पण त्यांनी कधीही कोणत्या व्यसनाला हात लावला नाही. मात्र, बाकीचे खेळाडू अशा सवयींमध्ये अडकतात, पण जडेजा नेहमी शिस्तबद्ध राहतात.”
“मेरे पति (रवींद्र जडेजा , क्रिकेटर)को लंदन , दुबई, ऑस्ट्रेलिया जैसे अनेकों देशों में खेलने के लिए जाना होता है फिर भी आज दिन तक उन्होंने कभी व्यसन नहीं किया क्योंकि वो अपनी जवाबदारी को समझते हैं @Rivaba4BJP जी , शिक्षा मंत्री गुजरात सरकार #Rivabajadeja #ravindrajadeja pic.twitter.com/OyuiPFPvVa
— राणसिंह राजपुरोहित (@ransinghBJP) December 10, 2025
रिवाबाने कोणत्याही विशिष्ट खेळाडूचे नाव घेतले नसले तरी, तिच्या या वक्तव्यामुळे भारतीय क्रिकेट संघाचे वातावरण आणि संस्कृती यावर मोठा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जडेजा देखील अशा परिस्थितीत अडकू शकले असते, पण एक व्यावसायिक खेळाडू म्हणून त्यांनी नेहमी संघ आणि खेळाला प्राधान्य दिले, असे मत रिवाबाने व्यक्त केले.
हेही वाचा – Vinesh Phogat : कुस्तीपटू विनेश फोगाटने घेतला यू-टर्न! निवृत्ती मागे घेत आगामी ऑलिम्पिकसाठी सुरु केली तयारी
रवींद्र जडेजाची कारकीर्द –
३७ वर्षीय रवींद्र जडेजाने २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून त्यांनी ८९ कसोटी, २०७ एकदिवसीय आणि ७४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यांच्या नावावर ६,५०० हून अधिक धावा आणि ६३४ विकेट्सची नोंद आहे. जडेजाने टी-२० आंतरराष्ट्रीयमधून निवृत्ती घेतली आहे, पण कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये तो अजूनही भारतीय संघाचा भाग आहेत. पुढील वर्षी जानेवारीमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील एकदिवसीय मालिकेत तो संघात पुनरागमन करेल.
हेही वाचा – Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा शतकी धडाका कायम! अंडर-१९ आशिया कपमध्ये रचला नवा इतिहास
दरम्यान, जडेजा आयपीएल २०२६ मध्ये राजस्थान रॉयल्स (RR) कडून खेळताना दिसणार आहेत. अनेक वर्षे चेन्नई सुपर किंग्सकडून खेळल्यानंतर, ट्रेडद्वारे संजू सॅमसनला चेन्नईत पाठवून जडेजाला राजस्थान रॉयल्स संघाने आपल्या ताफ्यात घेतले आहे. २००८ मध्ये त्यांनी राजस्थान रॉयल्सकडूनच आयपीएलची कारकीर्द सुरु केली होती.





