RR vs MI : बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर वैभवचा षटकार अन् रॉजस्थानने तिसऱ्यांदा केला ‘हा’ खास पराक्रम
RR vs MI : या विजयासह राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. या राजस्थानने एक खास पराक्रम केला आहे.

RR vs MI Vaibhav Suryavanshi vs Jasprit Bumrah IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या १३ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स (RR) संघाने आपला विजयाचा धडाका कायम राखत मुंबई इंडियन्सचा (MI) पराभव केला आहे. गुवाहाटीच्या मैदानावर १५ वर्षीय युवा खळबळ वैभव सूर्यवंशीने आपल्या स्फोटक फलंदाजीने जगातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही घाम फोडला. यासह राजस्थान रॉयल्सने एक खास विक्रम केला.
पावसाच्या व्यत्ययामुळे उशिरा सुरू झालेल्या या सामन्यात सर्वांच्या नजरा जसप्रीत बुमराह विरुद्ध वैभव सूर्यवंशी या लढतीकडे होत्या. मात्र, मैदानात उतरताच वैभवने अनुभवाची पर्वा न करता बुमराहवर हल्ला चढवला. बुमराह डावातील दुसरे षटक घेऊन आला तेव्हा वैभवने त्याच्या पहिल्याच चेंडूवर गगनचुंबी षटकार ठोकला. वैभवने अवघ्या १४ चेंडूंत ५ षटकार आणि १ चौकाराच्या मदतीने ३९ धावांची झंझावाती खेळी केली. विशेष म्हणजे बुमराह आपले पुढचे षटक घेऊन येण्यापूर्वीच वैभवने आपले काम फत्ते केले होते.
हार्दिक पंड्याकडून वैभवचे कौतुक –
Vaibhav ka jawaab nahi! 😍🔥
Jasprit Bumrah par bhi Vaibhav Sooryavanshi pade bhaari! 💪
Bhojpuri ka asli mazza sirf JioHotstar par dekhiye! 😍#TATAIPL 2026 | #RRvMI | LIVE NOW 👉 https://t.co/Dc4qz69QC4 pic.twitter.com/QcsrgoF9rG
— Star Sports (@StarSportsIndia) April 7, 2026
सामन्यानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने वैभवच्या खेळाचे भरभरून कौतुक केले. हार्दिक म्हणाला, “या मुलाची निडरता आणि फलंदाजी करण्याची शैली खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याला खेळताना पाहणे हा एक वेगळाच आनंद आहे.” दरम्यान, कौतुक करताना हार्दिकने वैभवचे वय १६-१७ वर्षे असल्याचे सांगितले, परंतु प्रत्यक्षात वैभव अवघ्या १५ वर्षांचा आहे. कदाचित ओघाओघात हार्दिककडून ही चूक झाली असावी, मात्र वैभवच्या प्रतिभेने त्याने सर्वांना प्रभावित केले आहे.
हेही वाचा – MI Vs RR : मुंबई इंडियन्स-राजस्थान रॉयल्स सामना रद्द होणार? जाणून घ्या संपूर्ण अपडेट्स
राजस्थान रॉयल्सचा ऐतिहासिक ‘विजय रथ’ –
या विजयासह राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. आयपीएल इतिहासात राजस्थानने सुरुवातीचे सलग तीन सामने जिंकण्याची ही केवळ तिसरी वेळ आहे. यापूर्वी २०१५ (सलग ५ विजय) आणि २०२४ (सलग ४ विजय) मध्ये संघाने अशी कामगिरी केली होती. आता रियान परागच्या नेतृत्वाखालील राजस्थानचा हा विजय रथ कोणता संघ रोखणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.





