Bumrah Fitness Test : श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघासाठी मोठी बातमी! जसप्रीत बुमराहबद्दल महत्त्वाची अपडेट आली समोर
Bumrah Fitness Test : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या फिटनेस टेस्टबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.

Jasprit Bumrah Passes Fitness Test At CoE ahead IND vs SL Test Series : ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघासाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने आपली फिटनेस टेस्ट यशस्वीपणे पास केली आहे. बंगळुरू येथील बीसीसीआयच्या (BCCI) ‘सेंटर ऑफ एक्सीलन्स’ने (CoE) बुमराहला पूर्णपणे फिट घोषित केले असून, आगामी श्रीलंका मालिकेसाठी त्याला ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे.
जसप्रीत बुमराह पुनरागमनासाठी सज्ज!
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान बुमराहला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो लॉर्ड्स येथील तिसऱ्या सामन्यात खेळू शकला नव्हता. बीसीसीआयच्या निवड समितीने श्रीलंका कसोटी मालिकेसाठी त्याची निवड फिटनेसच्या अटीवर केली होती. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, बुमराह दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून त्याने फिटनेसशी संबंधित सर्व चाचण्या उत्तीर्ण केल्या आहेत. तो दोन्ही कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध असेल.
डब्ल्यूटीसी फायनलच्या दृष्टीने मालिका अत्यंत महत्त्वाची –
Jasprit Bumrah has reportedly passed his fitness tests and is set to be available for the Sri Lanka Tests in August.#SLvIND #TeamIndia pic.twitter.com/HBYbmS0LJk
— Circle of Cricket (@circleofcricket) July 31, 2026
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) फायनलच्या शर्यतीमधील स्थान कायम ठेवण्यासाठी भारतासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. भारताला उर्वरित ९ कसोटी सामन्यांपैकी किमान ७ सामने जिंकायचे आहेत. हर्षित राणा, नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडू दुखापतीमुळे आधीच या मालिकेतून बाहेर पडले असल्याने बुमराहचे पुनरागमन भारतासाठी मोलाचे ठरणार आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला कधी होणार सुरुवात?
Rohit Sharma with jasprit bumrah and shardul Thakur during today’s fitness test at NCA.🙌🔥
bRO looking fresh and fit.🔥 pic.twitter.com/fish8yob2N
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) August 30, 2025
शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय कसोटी संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना १५ ऑगस्टपासून गॉल येथे खेळला जाणार आहे. यानंतर मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना २३ २३ ऑगस्टपासून कोलंबो येथे खेळला जाणार आहे.
भारताने २०१७ मध्ये विराट कोहलीच्या कप्तानीखाली श्रीलंकेला त्यांच्याच भूमीत ३-० ने धूळ चारली होती. आता शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली संघ कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





