MI Vs RR : आयपीएल २०२६ स्पर्धेतील आजचा (७ एप्रिल) सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स (MI Vs RR) यांच्यात गुवाहाटीच्या एसीए बारसापारा स्टेडियमवर होणार आहे. मात्र, स्थानिक हवामानामुळे या सामन्यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. समालोचक हर्षा भोगले गुवाहाटीत पोहोचले असून, त्यांनी तासभरापूर्वी केलेल्या ट्विटमध्ये ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस (MI Vs RR) सुरू असल्याचे सांगितले आहे. स्थानिक मीडियाकडून मिळालेल्या माहितीनुसार, साडेपाच वाजता पावसाचा वेग वाढला असून, स्टेडियमवर कव्हर्स लावण्यात आले आहेत. यामुळे सामना वेळेत (संध्याकाळी ७.३० वाजता) सुरू होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. 16.35 in Guwahati and it is already dark, the headlights on the cars are on and…….it is pouring — Harsha Bhogle (@bhogleharsha) April 7, 2026 हवामानाची स्थिती चिंताजनक गुवाहाटीमध्ये सध्या वादळी पाऊस, विजांचा कडकडाट सुरू आहे आणि IMD ने Orange Alert जारी केले आहे. संध्याकाळीही पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. मैदान ओले झाल्याने सामना सुरू होण्यास विलंब होणे किंवा तो पूर्णपणे रद्द होण्याची मोठी शक्यता आहे. MI vs RR चाहत्यांची उत्सुकता: वैभव सूर्यवंशी विरुद्ध जसप्रीत बुमराह या सामन्यात (MI Vs RR) १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी आणि जगातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराह यांच्यातील चुरस पाहण्यासाठी सर्व क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. मागील दीड वर्षात वैभवने भारतीय क्रिकेटमध्ये वेगळा ठसा उमटवला आहे. आज तो बुमराहसमोर कसा खेळतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र, पावसामुळे या रोमांचक मुकाबल्यावर पाणी पडण्याची भीती आहे. सामना रद्द झाल्यास काय होईल? सामना उशीरा सुरू झाल्यास डकवर्थ-लुईस-स्टर्न (DLS) पद्धतीने षटकांची संख्या कमी केली जाईल. किमान ५-५ षटके खेळणे आवश्यक आहे. ११.१५ पर्यंत (कट-ऑफ टाईम) सामना सुरू न झाल्यास किंवा पुरेसे षटके खेळता न आल्यास सामना रद्द (No Result) घोषित केला जाईल. सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना १-१ गुण मिळतील. सध्या स्टेडियमवर पावसाचे कव्हर्स लावले गेले असून, मैदान सुकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हवामान अंदाज पाहता सामना वेळेत सुरू होणे कठीण दिसते. अधिकृत अपडेटसाठी BCCI आणि आयपीएल अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.