Vaibhav Sooryavanshi Records : वैभव सूर्यवंशीचा मुल्लानपूरमध्ये महासंग्राम! वॉर्नरचा १० तर जयसूर्याचा १८ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड एकाच डावात मोडले
Vaibhav Sooryavanshi Records : राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशीने अवघ्या २९ चेंडूंमध्ये ९७ धावा ठोकल्या आणि एकाच फटक्यात अनेक मोठे विक्रम मोडले.

Vaibhav Sooryavanshi Powerplay Records : आयपीएल २०२६ च्या ‘एलिमिनेटर’ सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीने अवघ्या २९ चेंडूंत ९७ धावांची ऐतिहासिक आणि वादळी खेळी खेळली. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि तब्बल १२ गगनचुंबी षटकार ठोकले. ख्रिस गेलचा सर्वात वेगवान शतकाचा विक्रम अवघ्या ३ धावांनी हुकला असला, तरी १५ वर्षांच्या या फलंदाजाने पॉवरप्लेमध्ये फलंदाजीचा नवा इतिहास रचत अनेक ऑल-टाइम रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत.
डेव्हिड वॉर्नरचा मोडला १० वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम
वैभव सूर्यवंशीने या हंगामात आपल्या स्फोटक फलंदाजीने केवळ सर्वाधिक षटकार मारण्याचाच विक्रम केला नाही, तर तो आता आयपीएलच्या एकाच हंगामात पॉवरप्लेमध्ये (पहिली ६ षटके) सर्वाधिक धावा करणारा जगातील नंबर १ खेळाडू बनला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरच्या नावावर होता, ज्याने २०१६ च्या हंगामात पॉवरप्लेमध्ये ४६७ धावा कुटल्या होत्या. वैभवने आता ४९० धावा करत वॉर्नरला मागे टाकले आहे.
आयपीएलच्या एका हंगामात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज:
-
- वैभव सूर्यवंशी: ४९० धावा (साल २०२६) *
- डेव्हिड वॉर्नर: ४६७ धावा (साल २०१६)
- ट्रेव्हिस हेड: ४०२ धावा (साल २०२४)
- साई सुदर्शन: ४०२ धावा (साल २०२५)
- अॅडम गिलक्रिस्ट: ३८२ धावा (साल २००९)
Rajasthan Royals finish with a gigantic 243/8 against SRH 👀🏏🔥
Vaibhav Sooryavanshi stole the show with a breathtaking 97 off only 29 balls 💥#RR #SRH #VaibhavSooryavanshi #IPL2026 #Cricket pic.twitter.com/Q7ejAHOpkE
— Cricadium (@Cricadium) May 27, 2026
सनथ जयसूर्याचा १८ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला –
हैदराबादविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात वैभवने पहिल्या चेंडूपासूनच गोलंदाजांची पिसं काढण्यास सुरुवात केली होती. सामन्यात पहिल्या ६ ओव्हर्सचा खेळ संपला, तेव्हा वैभवच्या बॅटमधून तब्बल ८ षटकार पाहायला मिळाले होते. यासह आयपीएलच्या इतिहासात पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत त्याने श्रीलंकेचा दिग्गज सनथ जयसूर्याचा २००८ मधील ७ षटकारांचा विक्रम मोडीत काढला.
आयपीएलमध्ये पहिल्या ६ ओव्हर्समध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू:
-
-
- वैभव सूर्यवंशी: ८ छक्के (विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, २०२६) *
- सनथ जयसूर्या: ७ छक्के (विरुद्ध सीएसके, २००८)
- जोस बटलर: ७ छक्के (विरुद्ध दिल्ली कैपिटल्स, २०१८)
- जॉनी बेअरस्टो: ७ छक्के (विरुद्ध आरसीबी, २०२२)
-





