RR vs LSG : वैभव सूर्यवंशीचा पदार्पणातच धमाका! पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार ठोकत रचला इतिहास

RR vs LSG Vaibhav Suryavanshi Makes IPL History with Debut Six : वैभव सूर्यवंशी… हे नाव येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत लक्षात राहील, फक्त भारतीय क्रिकेटमध्येच नाही तर जागतिक क्रिकेटमध्येही. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी, जेव्हा मुले घरापुढे, वसाहतींच्या उद्यानांमध्ये आणि मैदानांमध्ये खेळत असतात, अभ्यास करत असतात, तेव्हा या फलंदाजाने क्रिकेटच्या जगात इतिहास रचला आहे. त्याने सर्वात तरुण पदार्पणवीर म्हणून तर इतिहासच रचला होता. मात्र, यानंतरही पदार्पणातील पहिल्याच चेंडूवर षटकार मारत विक्रमांची रांग लावली आहे.
वैभव सूर्यवंशीचा पदार्पणातच धमाका –
आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू ठरलेल्या वैभवने केवळ १४ वर्षे आणि २७ दिवसांच्या वयात आयपीएलमध्ये पदार्पण करून इतिहास रचला. इतकेच नव्हे, तर वैभवने त्याच्या आयपीएल कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर एक खणखणीत षटकार मारून संपूर्ण जगाला आश्चर्यचकित केले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार ठोकत रचला इतिहास –
A VIDEO TO REMEMBER IN IPL HISTORY 👑
– ITS VAIBHAV SURYAVANSHI..!!!! pic.twitter.com/ZuKskRWyI7
— Johns. (@CricCrazyJohns) April 19, 2025
वैभवने सूर्यवंशी आयपीएल कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर खणखणीत षटकार ठोकणारा आयपीएल इतिहासतील १० वा खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर राजसथ्यान रॉयल्सचा तिसरा खेळाडू ठरला. त्याच्या आधी रॉब क्विनी आणि केव्हॉन कूपर यांनी हा पराक्रम केला होता.
हेही वाचा – RR vs LSG : वैभव सूर्यवंशीने केला ऐतिहासिक पराक्रम! आयपीएलच्या इतिहासातील ठरला सर्वात तरुण पदार्पणवीर
आयपीएल कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर षटकार मारणे खेळाडू –
- रॉब क्विनी (आरआर)
- केव्हॉन कूपर (आरआर)
- आंद्रे रसेल (केकेआर)
- कार्लोस ब्रेथवेट (डीडी)
- अनिकेत चौधरी (आरसीबी)
- जेव्हॉन सिएर्ल्स (केकेआर)
- सिद्धेश लाड (एमआय)
- महेश थीकशन (सीएसके)
- समीर रिझवी (सीएसके)
- वैभव सूर्यवंशी (आरआर)*
हेही वाचा – GT vs DC : बटलरच्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरातचा दणदणीत विजय, दिल्लीचा दुसरा पराभव
वैभव सूर्यवंशी धमाकेदार आयपीएल पदार्पण केल्यानंतर ३४ धावा करून बाद झाला. त्याने २० चेंडूंचा सामना केला आणि दोन चौकार आणि तीन षटकार मारले. त्याला एडन मारक्रमच्या षटकात ऋषभ पंतने स्टंपिंग आऊट केले. अशा प्रकारे राजस्थान रॉयल्सला नवव्या षटकात ८५ धावांवर पहिला धक्का बसला.





