GT vs DC Gujarat Titans beat Delhi Capitals by 7 wickets : जोस बटलर आणि शेरफेन रदरफोर्ड यांच्यातील शानदार भागीदारीमुळे गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिटल्सचा सात विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने २० षटकांत आठ गडी गमावून २०३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल, बटलरने ५४ चेंडूत ११ चौकार आणि चार षटकारांसह नाबाद ९७ धावा फटकावल्या आणि गुजरातने १९.२ षटकांत ३ बाद २०४ धावा करून सामना जिंकला. गुजरातकडून राहुल तेवतियाने चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.
जोस बटलरचे हुकले शतक –
लक्ष्याचा पाठलाग करताना, गुजरातची सुरुवात चांगली झाली नाही. कारण त्यांनी कर्णधार शुबमन गिलला लवकर गमावले. सात धावा काढून गिल धावबाद झाला. यानंतर, साई सुदर्शन आणि बटलर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली आणि संघाची सूत्रे हाती घेतली. सुदर्शन चांगली फलंदाजी करत होता पण २१ चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ३६ धावा काढल्यानंतर तो बाद झाला. त्यानंतर बटलर आणि रदरफोर्ड यांनी शानदार फलंदाजी केली आणि दिल्लीच्या गोलंदाजांना खूप त्रास दिला. बटलर आणि रदरफोर्ड यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी केली.
शेवटच्या षटकात गुजरातला जिंकण्यासाठी १० धावांची आवश्यकता होती –
Jos Buttler’s handbook on how to play yorkers 🤌
How good was he against Mitchell Starc in that over?
Updates ▶️ https://t.co/skzhhRVXOV#TATAIPL | #GTvDC | @gujarat_titans | @josbuttler pic.twitter.com/TefoBUA4g6
— IndianPremierLeague (@IPL) April 19, 2025
या सामन्यात रदरफोर्ड एक प्रभावशाली खेळाडू म्हणून आला आणि अखेर मुकेश कुमारने त्याला बाद केले. रुदरफोर्डने ३४ चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या. रदरफोर्ड बाद झाल्यानंतर सामना रोमांचक परिस्थितीत पोहोचला. शेवटच्या षटकात गुजरातला जिंकण्यासाठी १० धावांची आवश्यकता होती आणि तेवतिया क्रीजवर उपस्थित होते. मिचेल स्टार्कच्या पहिल्या चेंडूवर तेवतियाने षटकार मारला आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार मारून सामना संपवला. तेवतियाने ३ चेंडूत ११ धावा काढत नाबाद राहिला. दिल्लीकडून कुलदीप यादव आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी एक विकेट्स घेतली.
हेही वाचा – GT vs DC : लाइव्ह सामन्यात इशांत-आशुतोषमध्ये जुंपली, काय होतं कारण? पाहा VIDEO
त्तत्पूर्वी प्रसिधने डीसीच्या वेगावर लावला ब्रेक –
या निकालापूर्वी, दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात केली होती. या सामन्यात दिल्लीचा कोणताही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही परंतु सलामीवीर अभिषेक पोरेल (१८) आणि करुण नायर (३१) आणि मधल्या फळीतील खेळाडू केएल राहुल (२८), आशुतोष शर्मा (३७) आणि ट्रिस्टन स्टब्स (३१) यांनी जलद योगदान दिले. एकेकाळी दिल्लीने फक्त ९ षटकांत १०० धावा केल्या होत्या पण प्रसिध कृष्णा (४/४१) आला आणि धावा रोखल्या. त्यानंतर दिल्लीचे फलंदाज काही मोठे षटके खेळताना दिसले पण विकेट्स पडतच राहिल्या. अशा परिस्थितीत, २२० धावा काढत असल्याचे दिसत असलेल्या दिल्लीला फक्त २०३ धावाच करता आल्या.