Vaibhav Suryavanshi : ज्याच्या नावाची धास्ती, त्यालाच १७ वर्षांच्या भारतीय वंशाच्या मुलाने केलं बोल्ड! पाहा VIDEO

Vaibhav Suryavanshi clean bowled video : अंडर-१९ वर्ल्ड कपमध्ये ज्याच्या तुफानी फलंदाजीची जगभरात चर्चा आहे, तो भारताचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी अमेरिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात सपशेल अपयशी ठरला. आपल्या आक्रमक खेळीने गोलंदाजांना घाम फोडणारा वैभव अवघ्या २ धावा काढून तंबूत परतला. अमेरिकेच्या अवघ्या १७ वर्षांच्या रित्विक अपीडी (Rithwik Appidi) याने त्याचा त्रिफळा उडवून खळबळ माजवली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
क्वीन्स स्पोर्ट्स क्लबची खेळपट्टी फलंदाजीसाठी काहीशी कठीण होती. अमेरिकेचा डाव अवघ्या १०७ धावांवर आटोपल्यानंतर भारत सहज विजय मिळवेल असे वाटत होते. मात्र, डावाच्या सुरुवातीलाच वैभव सूर्यवंशीने रित्विकच्या चेंडूवर पुढे सरसावून षटकार मारण्याचा प्रयत्न केला. चेंडूने बॅटची कडा घेतली आणि तो थेट स्टंपवर आदळला. केवळ ४ चेंडू खेळून वैभव २ धावांवर क्लीन बोल्ड झाला. वैभवसारख्या मोठ्या खेळाडूला बाद केल्यानंतर रित्विकने मैदानात जोरदार सेलिब्रेशन केले.
कोण आहे रित्विक अपीडी?
View this post on Instagram
रित्विक हा मूळचा भारतीय असून त्याचे नातेवाईक तेलंगणामध्ये राहतात. १० वर्षांचा असल्यापासून त्याने क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तो मुळात अष्टपैलू खेळाडू असून अमेरिकेच्या अंडर-१९ नॅशनल रँकिंगमध्ये त्याने ‘टॉप १०’ मध्ये स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे तो विराटचा मोठा फॅन आहे रित्विकने सामन्यानंतर सांगितले की तो विराट कोहलीचा खूप मोठा चाहता आहे.
रित्विक अपीडी अर्जेंटिना विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तसेच २०२५ मध्ये कॅरेबियनमध्ये झालेल्या चॅम्पियनशिपमध्येही तो अमेरिकेच्या संघात महत्त्वाचा खेळाडू होता. आजच्या सामन्यात अमेरिकेचा संघ भलेही १०७ धावांवर बाद झाला असला, तरी रित्विकने भारताच्या सर्वात मोठ्या मॅचविनरला बाद करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यानंतर अमेरिकेने ४ षटकानंतर १ बाद २१ धावा केल्यानंतर खेळ थांबला आहे.





