Vaibhav Sooryavanshi Statement : ‘फक्त खेळायला आलो नाही, तर पुढील २० वर्षे…’, वैभव सूर्यवंशीचं मोठं वक्तव्य; विराटबद्दलही केला खुलासा, पाहा VIDEO
Vaibhav Sooryavanshi Statement : आयपीएल संपल्यानंतर राजस्थान रॉयल्सचे मॅनेजर रोमी भिंडर यांना दिलेल्या एका विशेष मुलाखतीत १५ वर्षांच्या या डावखुऱ्या फलंदाजाने त्याचे मोठे इरादे स्पष्ट केले आहेत.

Vaibhav Sooryavanshi Statement in Interview With Romi Bhinder : आयपीएल २०२६ चा ‘ऑरेंज कॅप’ विजेता आणि भारतीय टी-२० संघाचा नवा ‘वंडर बॉय’ वैभव सूर्यवंशी सध्या त्याच्या धडाकेबाज कामगिरीमुळे जगभर चर्चेत आहे. आयपीएल संपल्यानंतर राजस्थान रॉयल्सचे मॅनेजर रोमी भिंडर यांना दिलेल्या एका विशेष मुलाखतीत १५ वर्षांच्या या डावखुऱ्या फलंदाजाने त्याचे मोठे इरादे स्पष्ट केले आहेत. वैभवने स्पष्ट शब्दांत सांगितले की, तो भारतीय क्रिकेटमध्ये फक्त खेळण्यासाठी आलेला नाही, तर पुढील दोन दशके (२० वर्षे) क्रिकेट जगतावर पूर्णपणे वर्चस्व गाजवण्यासाठी आला आहे.
विराट भैयाने खांद्यावर हात ठेवला अन् स्वप्न पूर्ण झाले!
राजस्थान रॉयल्सने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये वैभवने आयपीएल २०२६ च्या फायनल सामन्यानंतर महान फलंदाज विराट कोहलीशी झालेल्या भेटीचा एक भावनिक किस्सा शेअर केला. वैभव म्हणाला, “जेव्हा विराट भैयाने माझ्या खांद्यावर हात ठेवला, तेव्हा मला असे वाटले की मी एखादे सुंदर स्वप्न पाहत आहे. तो क्षण माझ्यासाठी स्वप्नपूर्तीसारखा होता.” ऑरेंज कॅप जिंकण्याबाबत तो म्हणाला, “हे माझे स्वप्न होते की मी या कॅपला एकदा तरी स्पर्श करून पाहावे. संपूर्ण स्पर्धेत मी याचा विचार केला नाही, कारण विचार केला की नजर लागते!”
फायनल न खेळल्याचे दुःख; एकाच वेळी ५ पुरस्कारांवर ताबा!
Inside Royals: The Vaibhav Sooryavanshi Interview. Tomorrow morning, 11 AM 💗 pic.twitter.com/K5Qtvj4Eo2
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) June 6, 2026
राजस्थान रॉयल्स फायनलमध्ये न पोहोचल्याबद्दल वैभवने खंत व्यक्त केली. “जर आम्ही शेवटच्या सामन्यात लवकर विकेट्स गमावल्या नसत्या, तर आम्ही प्रेक्षकांमध्ये बसून फायनल पाहिली नसती, तर मैदानावर खेळत असतो. राजस्थान रॉयल्ससाठी केवळ दुसरीच नाही, तर येत्या काळात ३, ४ आणि ५ ट्रॉफी जिंकण्याचे आमचे लक्ष्य आहे,” असा विश्वास त्याने व्यक्त केला. वैभवने आयपीएल २०२६ च्या फायनलनंतर एकाच वेळी ५ मोठे पुरस्कार जिंकून इतिहास रचला आहे. यात ऑरेंज कॅप, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, सुपर स्ट्रायकर ऑफ द सीजन, इमर्जिंग प्लेयर आणि सर्वाधिक ७२ षटकार मारण्याचा विक्रम समाविष्ट आहे.
तिन्ही फॉरमॅट खेळण्याचे स्वप्न!
आपल्या भविष्यातील योजनांबद्दल बोलताना वैभव म्हणाला, “मला रेड बॉल क्रिकेट खेळायला खूप आवडते आणि मी त्याचा सरावही करतो. माझे स्वप्न भारतासाठी तिन्ही फॉरमॅट (कसोटी, वनडे, टी-२०) खेळण्याचे आहे.” १५ वर्षांच्या या मुलाची ही परिपक्वता पाहून निवडकर्तेही थक्क झाले आहेत, म्हणूनच त्याची आगामी आयर्लंड, इंग्लंड दौरा आणि एशियन गेम्ससाठी भारतीय मुख्य संघात निवड करण्यात आली आहे.





