Vaibhav Sooryavanshi Headlines : वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा इंग्लंडमध्येही जलवा! ७ जूनच्या ब्रिटीश वृत्तपत्रांमध्ये छापून आले कौतुक, पाहा VIDEO
Vaibhav Sooryavanshi Headlines : ७ जूनच्या इंग्लंडमधील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये वैभव सूर्यवंशीच्या संघ निवडीच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर छापून आल्या आहेत.

Vaibhav Sooryavanshi Headlines In England Newspapers : आयपीएल २०२६ च्या हंगामात ७७६ धावा कुटून ‘ऑरेंज कॅप’ जिंकणाऱ्या १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आता थेट इंग्लंडमध्येही आपल्या नावाची दहशत निर्माण केली आहे. ६ जून रोजी बीसीसीआयने आयर्लंड, इंग्लंड दौरा आणि एशियन गेम्ससाठी भारतीय सीनियर संघात वैभवची निवड करताच, ब्रिटीश माध्यमांमध्ये या भारतीय वंडर बॉयचा प्रचंड बोलबाला पाहायला मिळत आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी (७ जून) चक्क वैभव सूर्यवंशीच्या नावाची जोरदार चर्चा रंगली.
लॉर्ड्सवर स्काय स्पोर्ट्सच्या शोमध्ये वैभवचे कौतुक; ‘ईसीबी’ मालामाल होणार!
लॉर्ड्स कसोटीच्या चौथ्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वी, प्रसिद्ध ब्रॉडकास्टर ‘स्काय स्पोर्ट्स’च्या थेट शोमध्ये इंग्लंडचे माजी कर्णधार मायकेल आथर्टन आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू मार्क बाउचर वैभव सूर्यवंशीवर चर्चा करत होते. ७ जूनच्या इंग्लंडमधील प्रमुख वृत्तपत्रांमध्ये वैभव सूर्यवंशीच्या संघ निवडीच्या बातम्या मोठ्या प्रमाणावर छापून आल्या आहेत.
या शोदरम्यान क्रिकेट तज्ज्ञांनी सांगितले की, “१५ वर्षांच्या या मुलाला इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर खेळताना पाहण्यासाठी ब्रिटीश फॅन्स कमालीचे उत्सुक आहेत.”
“I’d imagine the ECB are happy… that’ll shift a few more tickets!” 🤑
“224 SR over an entire tournament… nuts!” 🌟Elizabeth Ammon & Mark Butcher on 15-year-old Vaibhav Sooryavanshi’s selection for India’s upcoming T20I tours of England & Ireland 🇮🇳 pic.twitter.com/5onoBuV9Te
— Sky Sports Cricket (@SkyCricket) June 7, 2026
तसेच मिश्कील टिप्पणी करताना एका तज्ज्ञाने म्हटले की, वैभवच्या निवडीमुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डाला (ECB) सर्वाधिक आनंद झाला असेल, कारण त्याच्या लोकप्रियतेमुळे आता भारत-इंग्लंड टी-२० मालिकेची सर्व तिकिटे हातोहात विकली जातील. तसेच आयपीएल २०२६ मधील वैभवच्या २२४ च्या अद्भूत स्ट्राईक रेटचे दिग्गजांनी तोंडभरून कौतुक केले.
गेल्या वर्षीच्या इंग्लंड दौऱ्याचा मिळणार फायदा!
Vaibhav Suryavanshi is already making headlines in England at just 15 years of agehttps://t.co/7Wm3X0Tlrs#SaiSudarshan #ManavSuthar #Ashwin #NewChandigarh #Sena #Pant #Gambhir #Tests #BCCI #ShreyasIyer #KLRahul #Tests #Sportswiz pic.twitter.com/GX2hYrASVr
— SPORTS WIZ (@mysportswiz) June 7, 2026
वैभव सूर्यवंशीने गेल्या वर्षी भारताच्या अंडर-१९ संघासोबत इंग्लंडचा दौरा केला होता, जिथे त्याने रेड बॉल आणि मर्यादित षटकांच्या मालिकेत सहभाग घेतला होता. त्यामुळे त्याला इंग्लंडमधील वातावरणाचा आणि खेळपट्ट्यांचा चांगला अनुभव आहे. सीनियर संघात स्थान मिळाल्यानंतर वैभवला या अनुभवाचा मोठा फायदा होईल. इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारत आयर्लंडविरुद्ध दोन टी-२० सामने खेळणार असून, याच मालिकेत वैभवचे आंतरराष्ट्रीय पदार्पण निश्चित मानले जात आहे.
इंग्लंडमधील वर्तमानपत्राने भारताचा वंडर बॉय वैभव सूर्यवंशीची खेळी पाहण्यासाठी तयार रहा, अशी हेडलाईन छापत इंग्लंडच्या चाहत्यांना आवाहन केले आहे. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा होत असून त्याचे फोटो आणि आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.





