Vaibhav Sooryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीने मोडला सचिनचा ३७ वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक रेकॉर्ड! एकाच वेळी केला ‘ट्रिपल’ धमाका
Vaibhav Sooryavanshi Record : वैभव सूर्यवंशीने 'क्रिकेटचा देव' मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा तब्बल ३७ वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक रेकॉर्ड मोडला आहे.

Vaibhav Sooryavanshi Breaks Sachin Tendulkar Record : बीसीसीआयने शनिवारी ऐतिहासिक निर्णय घेत आगामी तीन मोठ्या मालिकांसाठी भारतीय टी-२० संघांची घोषणा केली आहे. या संघ निवडीमध्ये १५ वर्षांच्या युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने थेट सीनियर भारतीय संघात स्थान मिळवून इतिहास रचला आहे. वैभवची एकाच वेळी आयर्लंड दौरा, इंग्लंड दौरा आणि जपानमधील एशियन गेम्स २०२६ अशा तिन्ही संघांमध्ये निवड झाली आहे. यासह त्याने ‘क्रिकेटचा देव’ मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा तब्बल ३७ वर्षांपूर्वीचा सर्वात तरुण खेळाडूचा रेकॉर्ड मोडला आहे.
वैभवने मोडला सचिन तेंडुलकरचा ३७ वर्षांचा जुना रेकॉर्ड (Vaibhav Sooryavanshi Record)
सचिन तेंडुलकरला १९८९ मध्ये पाकिस्तान दौऱ्यासाठी जेव्हा भारतीय संघात स्थान मिळाले होते, तेव्हा त्याचे वय १६ वर्षे २०५ दिवस होते. मात्र, आता अवघ्या १५ वर्षे ७१ दिवस वय असलेल्या वैभव सूर्यवंशीने भारतीय मुख्य संघात प्रवेश मिळवला आहे. अंडर-१९ क्रिकेट आणि पाठोपाठ आयपीएल २०२६ मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोलंदाजांची धूळदाण उडवल्याचे हे मोठे बक्षीस त्याला मिळाले आहे. (Vaibhav Sooryavanshi Record)
आयपीएल २०२६ चा संपूर्ण हंगाम गाजवला – (Vaibhav Sooryavanshi Record)
Presenting #TeamIndia‘s T20I squads for the tours of England & Ireland 2026 🇮🇳#ENGvIND | #IREvIND pic.twitter.com/f84kSSAIDf
— BCCI (@BCCI) June 6, 2026
वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२६ च्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळताना १६ सामन्यांत सर्वाधिक ७७६ धावा कुटून ‘ऑरेंज कैप’ जिंकली होती. तो आयपीएलच्या इतिहासात एकाच हंगामात ऑरेंज कॅप, ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर’ आणि ‘इमर्जिंग प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ हे तिन्ही पुरस्कार जिंकणारा जगातील पहिला आणि सर्वात तरुण खेळाडू ठरला होता.
दौऱ्यांचे वेळापत्रक : (Vaibhav Sooryavanshi Record )
भारतीय संघ २६ आणि २८ जून रोजी आयर्लंडविरुद्ध २ टी-२० सामने खेळेल. त्यानंतर १ ते ११ जुलै दरम्यान इंग्लंडविरुद्ध ५ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. तर एशियन गेम्समधील क्रिकेट स्पर्धा २४ सितंबर ते १३ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. या तिन्ही महत्त्वाच्या स्पर्धांसाठी स्टार फलंदाज श्रेयस अय्यरकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे, तर तिलक वर्मा उपकर्णधार असेल.
एशियन गेम्ससाठी भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंह, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती आणि वैभव सूर्यवंशी.





