Jasprit Bumrah : सचिन तेंडुलकरच्या ‘त्या’ वाक्यामुळे बुमराह बनला भेदक गोलंदाज; काय आहे ‘तो’ प्रसंग?

मुंबई : भारताचा हुकमी एक्का म्हणजे जसप्रीत बुमराह हा सध्याच्या घडीला जगातील सर्वाेत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक आहे. या खेळाडूमध्ये एकहाती सामना फिरवण्याची क्षमता आहे. अनेकवेळा त्याने ते दाखवूनदेखील दिले आहे. बुमराह जेव्हा सुरूवातीला मुंबईच्या संघात दाखल झाला तेव्हा सचिन तेंडुलकरने त्याला एक सल्ला दिला आणि ज्यामुळे तो एक उत्कृष्ट गोलंदाज बनला आहे.
सचिन तेंडुलकरने काय दिला सल्ला?
जसप्रीत बुमराह २०१३ मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाता सामील झाला होता.“जेव्हा तो संघात आला तेव्हा सचिन तेंडुलकरही खेळत होता आणि तो त्याचा शेवटचा हंगाम होता तर बुमराहचा पहिला हंगाम होता. तेव्हा बुमराह थोडा भारावून गेला होता. यावेळी सामना सुरु होण्यापूर्वी सचिन तेंडुलकरने बुमराहला एक महत्वाचा सल्ला दिला. तेंडुलकर म्हणाला ”एखादी व्यक्ती किंवा तिचं नाव न पाहता फक्त एक फलंदाज म्हणून त्याला गोलंदाजी कर.” असा सल्ला दिला.
𝗟𝗲𝗴𝗲𝗻𝗱…wait for it…𝗱𝗮𝗿𝘆 🔥
A 🔝 performance by Jassi bhai on a 🔝 day 🙌@ril_foundation | #ESADay #EducationAndSportsForAll #MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #MIvLSG pic.twitter.com/XdJAOWFzw1
— Mumbai Indians (@mipaltan) April 27, 2025
यानंतर, बुमराहने कधीही मागे वळून पाहिले नाही आणि तो भारताचा सर्वोत्तम गोलंदाज म्हणून उदयास आला. बुमराह आता कसोटीमध्ये भारतासाठी २०० अधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. इतकंच नव्हे तर बुमराह संघाचा तिन्ही फॉरमॅटमधील महत्त्वाचा गोलंदाज आहे. मुंबईसाठी, जसप्रीत बुमराहने आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत १४० सामन्यांमध्ये १७६ विकेट्स घेतल्या आहेत. मुंबईकडून तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे.





