पुणे जिल्हा | सिद्धेगव्हाणच्या उपसरपंचपदी स्वाती मोरे

शेलपिंपळगाव, (वार्ताहर) – सिद्धेगव्हाण (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वाती शशिकांत मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राजेंद्र गाडे यांनी इतर सहकार्यांना संधी मिळावी यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सरपंच दौलत मोरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.
ग्रामपंचायत सदस्यांन मधून स्वाती मोरे यांचा एकमेव अर्ज आल्याने मोरे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल विघ्ने यांनी जाहीर केली. यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच दौलत मोरे, ग्रामपंचायत सदस्य मनोज मोरे, अविनाश मोरे, ज्योती साबळे, कांचन थोरात, अच्युता पवार व राजेंद्र गाडे सभागृहात उपस्थित होते.
नवनिर्वाचित उपसरपंचांचा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मला पानसरे, बाजार समितीचे संचालक सयाजी मोहिते, सरपंच परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत मोरे, माजी पंचायत समिती सदस्या सुरेखा वाडेकर, राष्ट्रवादीचे नेते प्रकाश वाडेकर, अॅड. सुखदेव पानसरे, अॅड. अरुण मुळूक, सरपंच उज्ज्वला गोकुळे, अश्विनी साबळे, सिताराम गुजर, विद्या मोहिते, पठाणराव वाडेकर, गणेश काटकर, राजेश मस्के यांच्यासह सरपंच परिषदेच्या अनेक सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहून सत्कार केला.





