पुणे जिल्हा : सोनोरीच्या उपसरपंचपदी श्रद्धा काळे

गराडे – सोनोरी (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्रद्धा राहुल काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
कार्यकाळ संपल्याने अलका शेळके यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त जागेसाठी सरपंच संतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आले.
यावेळी श्रद्धा काळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोद निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी अलका शेळके, भारत मोरे, नितीन काळे, रामदास काळे, सुरेखा माळवदकर, मंदाकिनी काळे, मंगल अढागळे, निवृत्ती गावडे, अण्णा काळे, शिवशेनेचे कार्येकर्ते उमेश गायकवाड, मंदार गिरमे, दिवे गावचे माजी सरपंच राजू झेंडे ,सुरेश काळे, दत्ता काळे, विलास काळे, श्रीधर शिंदे, बाबा काळे, सीमा झेंडे, सुभाष काळे, रमेश काळे, निखील दिवेकर आदी उपस्थित होते.
नवर्निवाचित उपसरपंच श्रद्धा काळे म्हणाल्या की, गावातील पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा, महिलांच्या मूलभूत गरजा, प्राधान्याने असणार्या अडचणी यावर माझ्या कार्यकाळात भरपूर वेळ देऊन सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार आहे. तसेच गावातील मंदिरात महिलांना आत जाण्याची परवानगी नव्हती. ती गावच्या एकमुखी धोरणामुळे आम्हा गावातील महिलांना मंदिरात प्रवेश मिळाला, असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रास्ताविक सरपंच संतोष काळे यांनी, सूत्रसंचालन जालिंदर काळे यांनी तर अॅड राहुल काळे यांनी आभार मानले.





