पुणे जिल्हा | खेडमध्ये तीन हजार जणांणा बीसीजी लस

शेलपिंपळगाव, (वार्ताहर) – खेड तालुक्यातील 73 हजार जणांना अडल्ट बीसीजी लसीकर मोहिमेचा एक डोस देण्याचा शुभारंभ झाला आहे. आत्तापर्यंत तालुक्यात 45 हजार लस उपलब्ध झाल्या असून अडीच ते तीन हजार लाभार्थींचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास माने दिली.
खेड तालुक्याच्या शेलपिंपळगाव आरोग्य केंद्रावर या मोहिमेचा शुभारंभ सरपंच शरद मोहिते, वैद्यकीय अधिकारी डॉ साईनाथ मानकरी, संतोष होनावळे, हनुमंत रावते, आरोग्य सेविका अशा दौंडकर, छाया इंगळे, शुभांगी इंगळे, उषा कराळे व ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला आहे.
भारत देश 2025 पर्यंत हा टीबी मुक्त व्हावा यासाठी आयसीएमआर संस्थेमार्फत अडल्ट बीसीजी लसीकरणाचा प्रायोगिक तत्त्वावर शुभारंभ पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात करण्यात आला.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अखत्यारित असणार्या 18 वर्षांपुढील पात्र लाभार्थ्यांना अडल्ट बीसीजी लसीकरण दिले जात असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ इंदिरा पारखे यांनी दिली.
लसीकरणाचा फायदा
– टीबी आजाराचे प्रमाण रोखण्यासाठी 40 टक्के होऊ शकतो फायदा
– क्षयरोग या आजारापासून संरक्षण मिळण्यासाठी होणार फायदा
– टीबी मुक्त भारत हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी
चौकट : कोण करू शकतं लसीकरण
– अठरा वर्षांपुढील पात्र लाभार्थी
– मागील पाच वर्षात टीबी झालेले रुग्ण
– टीबी रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्ती
– वयानुसार वजन कमी जास्त होत असणार्या व्यक्ती
– मधुमेह असणारे व्यक्ती
– धूम्रपान करणारे व्यक्ती
– साठ वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिक





