पुणे जिल्हा : भोलावडेच्या उपसरपंचपदी रेश्मा आवाळे यांची बिनविरोध निवड

भोर – भोर तालुक्यातील आदर्श गांव म्हणून ओळख असलेल्या मौजे भोलावडे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रेश्मा मंगेश आवाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपसरपंच अविनाश आवाळे यांनी पदाच्या दिलेल्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर सरपंच प्रवीण जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली.
रेश्मा आवाळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामसेवक पद्माकर डोंबाळे यांनी निवडणुकीचे निर्णयाधिकारी म्हणून काम पाहिले.
यावेळी सरपंच प्रवीण जगदाळे, माजी उपसरपंच अविनाश आवाळे व गणेश आवाळे, सदस्य प्रशांत पडवळ, ज्ञानेश्वर तारु, मनोज मोरे, पुष्पा आवाळे, भाग्यश्री सावंत, शुभांगी रणखांबे, वैशाली आवाळे, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन आवाळे, माजी सरपंच शशिकांत जगदाळे, ज्ञानोबा आवाळे, माजी उपसरपंच दत्तात्रय जगदाळे, मोहन आवाळे,
साहेबराव आवाळे, धर्माजी आवाळे, रामचंद्र गावडे, चंद्रकांत आवाळे, भरत आवाळे, दत्ता अब्दागिरे, ज्ञानेश्वर शिंदे, जगन्नाथ बदक, नितीन आवाळे, धनंजय आवाळे, चेतन आवाळे, संदीप जगदाळे यांच्यासह तरुण व ग्रामस्थ उपस्थित होते.





