IND vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन संघात मोठा बदल, अनकॅप्ड खेळाडूची अचानक एंट्री…

Australia announce squad for second India Test : भारताविरुद्धच्या पर्थ कसोटीतील दारुण पराभवानंतर पुनरागमनाच्या शोधात असलेल्या ऑस्ट्रेलियन संघात मोठा बदल पाहायला मिळाला आहे. वास्तविक, तस्मानियाचा अष्टपैलू खेळाडू ब्यू वेबस्टरचा भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
पर्थ येथील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या 295 धावांनी झालेल्या पराभवात हॅमस्ट्रिंगला दुखापत झालेल्या मिचेल मार्शसाठी वेबस्टरची कव्हर म्हणून निवड करण्यात आली आहे. मार्श एक विशेषज्ञ फलंदाज म्हणून खेळण्याच्या शर्यतीत आहे, तर त्याच्या गोलंदाजीच्या फिटनेसच्या चिंतेमुळे वेबस्टरचा संघात समावेश करण्यात आला आहे.
A new addition comes in as Australia announce a 14-player squad for the second Test against India in Perth 🤔#AUSvIND | #WTC25https://t.co/ewHB8n9dtW
— ICC (@ICC) November 28, 2024
पर्थ कसोटीदरम्यान मार्शला दुखापत झाली आणि मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर त्याच्या फिटनेसच्या समस्या वाढू लागल्या. इंग्लंड दौऱ्यापासूनच मार्शला या समस्येचा सामना करावा लागत असल्याचेही म्हटले जात आहे. मार्श एक विशेषज्ञ फलंदाज म्हणून खेळण्याच्या शर्यतीत आहे, पण त्याच्या गोलंदाजीच्या फिटनेसच्या चिंतेमुळे वेबस्टरचा संघात समावेश करण्यात आला आहे.
वेबस्टरचा राष्ट्रीय संघात समावेश हा त्याच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने केलेल्या चांगल्या कामगिरीचा परिणाम आहे. गेल्या उन्हाळ्यात शेफिल्ड शील्ड प्लेयर ऑफ द इयर म्हणून निवड झालेल्या 30 वर्षीय खेळाडूने एकाच मोसमात 900 हून अधिक धावा करून आणि 30 विकेट्स घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. या वर्षीही त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. त्याने 56 च्या सरासरीने 448 धावा केल्या आणि 16 विकेट घेतल्या, ज्यामध्ये भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ संघासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा देखील समावेश आहे.
मार्शच्या दुखापतीमुळे वाढल्या अडचणी…
ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी सुरुवातीला पहिल्या सामन्यासाठीचा 13 जणांचा संघ ॲडलेडसाठी कायम ठेवण्याची योजना आखली होती. तथापि, मार्शची तंदुरुस्ती चिंतेची बाब आहे, विशेषत: त्याने तीन वर्षांत एकाच सामन्यात सर्वाधिक षटके टाकली आहेत. गेल्या सात महिन्यांत अष्टपैलूची गोलंदाजी मर्यादित राहिली आहे, अशात वेबस्टरच्या समावेशामुळे ऑस्ट्रेलियाला आक्रमणाचा समतोल साधण्याचा विश्वासार्ह पर्याय उपलब्ध झाला आहे.
ICC Test Rankings : ‘बूम-बूम बुमराह’ पुन्हा एकदा अव्वलस्थानी, ‘या’ 2 दिग्गजांना टाकलं पिछाडीवर….
तर ब्यू वेबस्टरला पदार्पणाची संधी…
मार्शला दुखापतीमधून रिकव्हर होण्यासाठी वेळ आहे कारण ॲडलेड कसोटी सुरू होण्यासाठी अजून 8 ते 9 दिवस बाकी आहेत. वैद्यकीय पथक त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून आहे आणि जर तो वेळेत बरा झाला नाही तर ब्यू वेबस्टरला ॲडलेड कसोटीत आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.
ॲडलेड कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघ – पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिच मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर.





