IND vs AUS 2nd Test : विजयात लॅबुशेन-मॅकस्विनीची महत्वपूर्ण भूमिका – टीम पेन

IND vs AUS 2nd Test : बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पर्थ कसोटी भारताने जिंकल्यानंतर, ऍडलेड येथील गुलाबी कसोटीमध्ये कांगारूंनी भारताला 10 गडी राखून पराभूत केले. दुसऱ्या कसोटीमध्ये, ऑस्ट्रेलियाने भारताचा डाव 180 धावांवर रोखण्यात यश मिळविले होते. त्यानंतर दिवस-रात्र खेळल्या जाणाऱ्या कसोटीमध्ये शेवटच्या सत्रात ऑस्ट्रेलियाचे मार्नस लॅबुशेन आणि नॅथन मॅकस्विनी यांनी स्विंग होणाऱ्या गुलाबी चेंडूंसमोर, लढाऊ कामगिरी केल्यानेच ऑस्ट्रेलियाला या कसोटीत विजय मिळविता आला, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पेन याने व्यक्त केले.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अप्रतिम गोलंदाजीला न जुमानता, धावा काढण्यासाठी धडपडणाऱ्या लॅबुशेन आणि मॅकस्विनी यांनी पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात कठीण परिस्थितीत 57धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. याचा भागीदारीने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 300 पेक्षा अधिक धावसंख्या उभारता आली. पेन म्हणाला की, “मला विश्वास आहे की पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात आम्ही कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी केल्यानेच भारतावर विजय मिळविणे शक्य झाले.
यावेळी टीम पेनने पदार्पण करणाऱ्या स्कॉट बोलंडचे देखील कौतुक केले. तो म्हणाला, बोलंड फ्लडलाइट्स खाली गुलाबी चेंडूने पूर्ण उत्साहाने गोलंदाजी करत होता. ज्याची एकेकाळी 60 ची सरासरी होती, मात्र त्याची कारकीर्द वाचवण्यासाठी खेळत होता. त्यामुळे आम्हाला नवा चॅम्पियन बघायला मिळाला.
IND vs AUS 2nd Test : सिराज-हेडला भर मैदानात वाद घालणं पडलं महागात, ICC ने केली मोठी कारवाई….
हेझलवूड तिसरी कसोटी खेळणार…?
साईड स्ट्रेनमुळे दुसऱ्या कसोटीमध्ये न खेळणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड तिसऱ्या कसोटीमध्ये खेळणार की नाही, हे आगामी 24 तासात स्पष्ट होईल. ऍडलेडमध्ये झालेल्या दिवसरात्र लढतीत हेझलवूडचा समावेश अंतिम 11 मध्ये करण्यात आला नव्हता. ऑस्ट्रेलियाने ही लढत तिसऱ्याच दिवशी 10 गडी राखून जिंकला होता. पहिल्या कसोटीत दमदार गोलंदाजी करणाऱ्या हेझलवूडला तिसऱ्या कसोटीत संधी मिळेल का हे पाहणे उत्सुकतापूर्ण ठरणार आहे.





