IND vs AUS 2nd Test | कमिन्सच्या नियंत्रित आक्रमकतेनेच ऑस्ट्रेलियाचा विजय – ॲडम गिलख्रिस्ट

ऍडलेड – पर्थ येथे खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटीमध्ये भारताने ऑस्ट्रेलिया संघाला 295 धावांनी पराभूत केले होते. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर ऍडलेड येथील गुलाबी कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला 10 गडी राखून पराभूत करताना मालिका बरोबरीत आणली. कर्णधार पॅट कमिन्सने दुसऱ्या कसोटीमध्ये नियंत्रित आक्रमकता आणल्याने ऑस्ट्रेलियाला विजय मिळविता आला, असे मत महान यष्टीरक्षक ॲडम गिलख्रिस्टने व्यक्त केले.
फॉक्स क्रिकेटशी बोलताना ॲडम गिलख्रिस्ट म्हणाला, प्रत्येक भारतीय फलंदाजाला बाद केल्यानंतर पॅट कमिन्सचे आक्रमक भाव होते. पहिल्या लढतीत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी खराब कामगिरी केली होती. त्यामुळेच त्यांच्यावर देखील भरपूर टीका झाली. त्यामुळेच दुसऱ्या कसोटीत देखील कमिन्सची शैली बोलकी होती. त्याने खेळाडूंना उत्साही ठेवण्यासाठी नक्कीच मोलाची कामगिरी बजावलेली असल्याचे ॲडम गिलख्रिस्ट म्हणाला.
Test Cricket | भारत-द.आफ्रिका यांच्यात होऊ शकते WTC फायनल 2025, जाणून घ्या संपूर्ण समीकरण…
ते त्रिकुट दमदार….
ॲडम गिलख्रिस्ट म्हणाला, “कमिन्स अप्रतिम होता. पर्थनंतर त्याने खेळाडूंमध्ये जोश निर्माण केल्याचे दिसत होते. गुलाबी चेंडूच्या कसोटीत कमिन्स, मिचेल स्टार्क आणि स्कॉट बोलँड या वेगवान गोलंदाज त्रिकुटाच्या चमकदार कामगिरीमुळे अनुभवी फिरकीपटू नॅथन लायनने या सामन्यात फक्त एकच षटक टाकले. या दिवस-रात्र कसोटीत वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या सर्व 20 विकेट घेतल्या. त्यामुळेच हे वेगवान त्रिकुट नक्कीच दमदार आहे, असे तो बोलताना म्हणाला.





