IND vs AUS 2nd Test : विजयानंतरही ऑस्ट्रेलियाचे टॉप ऑर्डरचे सर्व फलंदाज दडपणाखाली – वॉर्नर

IND vs AUS 2nd Test :- काही काळापासून चांगली कामगिरी न केल्यामुळे टीकेचे लक्ष्य ठरलेला मार्नस लॅबुशेन ॲडलेडमध्ये दमदार अर्धशतक झळकावून फॉर्ममध्ये परतला असताना, सलामीवीर उस्मान ख्वाजा, स्टीव्हन स्मिथ आणि युवा सलामीवीर नॅथन मॅकस्विनी दमदार फलंदाजी करत असले तरीही ते बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये धावा काढण्यासाठी धडपडत आहेत. भारताविरुद्ध ॲडलेडमध्ये विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने मालिकेत बरोबरी साधली आहे. असे असूनही उस्मान ख्वाजाच नाही, तर ऑस्ट्रेलियन आघाडीच्या फळीतील (टॉप ऑर्डर) सर्व फलंदाजांवर दबाव जाणवत आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने व्यक्त केले.
ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर वॉर्नरने फॉक्स क्रिकेटला सांगितले की, “मला वाटते की सर्व शीर्ष क्रमाच्या फलंदाजांवर दबाव आहे. ट्रॅव्हिसने येऊन आक्रमण केले आणि शानदार शतक केले. तो अशा खेळी करण्यासाठी सक्षम खेळाडू आहे, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. मात्र, इतर फलंदाजांनीही त्याला फॉलो करणे गरजेचे असल्याचे वॉर्नरने सांगितले. तो पुढे म्हणाला, सर्व अव्वल सहा फलंदाजांनी मोठी धावसंख्या करणे आवश्यक आहे. यातून गोलंदाजाना पुरेशी विश्रांती मिळत असल्याची ते खात्री करत आहेत. ऍडलेड सामन्यात मिचेल स्टार्कने नेहमीप्रमाणे गुलाबी चेंडूने चांगली कामगिरी केली.
शनिवारपासून ब्रिस्बेनमध्ये सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या संदर्भात वॉर्नर म्हणाला, “मला आशा आहे की आमचे आघाडीचे फलंदाज ब्रिस्बेनमध्ये मोठी खेळी खेळतील, पर्थमध्ये नॅथन मॅकस्विनीने कसोटीमध्ये पदार्पण केले आहे. त्याने 59 धावांची झुंजार खेळी केली होती. जेव्हा सलामीच्या फलंदाजाचा विचार केला जातो तेव्हा त्याला सर्वात कठीण भूमिका बजावावी लागते आणि मला विश्वास आहे की मॅकस्विनी ही भूमिका निभावण्यात यशस्वी झाला आहे, असे तो म्हणाला.
तर तुम्ही कसोटीसाठी पात्र कसे ?
नॅथन मॅकस्विनीचा सलामीचा जोडीदार उस्मान ख्वाज़ाने या मालिकेत केवळ 34 धावा केल्या आहेत. गेल्या 16 डावांमध्ये त्याला फक्त एकदाच 50 धावांचा टप्पा गाठता आला आहे. माजी कर्णधार स्मिथही वाईट टप्प्यातून जात आहे. त्याने आतापर्यंत तीन डावात केवळ 19 धावा केल्या आहेत. मर्यादित षटकांचा स्पेशालिस्ट ग्लेन मॅक्सवेलचा कसोटी संघात समावेशाबाबत चर्चा आहे, यावर वॉर्नर म्हणाला, जर तुमची देशांतर्गत क्रिकेटच्या चार दिवसीय स्पर्धेसाठी निवड होत नसेल, तर तुम्ही कसोटी संघात स्थान मिळविण्यासाठी पात्र कसे ठरता..? मला वाटत नाही की तो या संघाचा भाग होऊ शकतो.





