Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; सामूहिक राजीनाम्यांनी राज्यात खळबळ
Maharashtra Politics : खासदार संजय देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने हादरलेल्या ठाकरे गटाला आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

Maharashtra Politics : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासाठी आणखी एक मोठा धक्का समोर आला आहे. खासदारांच्या पक्षांतरानंतर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरले असतानाच, त्यांच्या यवतमाळ-वाशिम दौऱ्यानंतर अवघ्या 24 तासांत 15 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra Politics)
खासदार संजय देशमुख यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आणि संघटना पुन्हा उभी करण्याच्या उद्देशाने यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी बंडखोर खासदारांवर जोरदार टीकाही केली होती. (Maharashtra Politics)
सभेला उपस्थित, अन् दुसऱ्याच दिवशी राजीनामे
विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांच्या सभेला उपस्थित राहिलेले 15 पदाधिकारी यांनीच दुसऱ्याच दिवशी आपल्या पदांचे राजीनामे दिले. या सर्वांनी आपले राजीनामे थेट जिल्हा संपर्क प्रमुखांकडे सादर केले. (Maharashtra Politics)
राजीनामा पत्रात सर्वांनी ‘वैयक्तिक कारणास्तव पदाचा राजीनामा देत आहोत’ असे नमूद केले असले, तरी या सामूहिक निर्णयामागे पक्षांतर्गत नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Maharashtra Politics)
ठाकरेंसमोरील संघटनात्मक आव्हान वाढले
यवतमाळ-वाशिम मतदारसंघात खासदार संजय देशमुख यांच्या पक्षांतरानंतर ठाकरे गटासमोर संघटना टिकवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी स्वतः दौरे सुरू केले असले, तरी त्यांच्या दौऱ्यानंतर लगेचच स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सामूहिक राजीनाम्यामुळे पक्षाच्या संघटनात्मक ताकदीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Maharashtra Politics)
दरम्यान, या घडामोडींमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Politics)






