Maharashtra Politics : भाजप शिवसेनेसह शरद पवारांना मोठा धक्का; पक्षातील शेकडो पदाधिकारी राष्ट्रवादीच्या ताफ्यात
Maharashtra Politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येवला मतदारसंघात एक अत्यंत मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे.

Maharashtra Politics : नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची राजकीय ताकद आणखी वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे येवला तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra Politics)
समीर भुजबळांकडे संघटन विस्ताराची जबाबदारी
येवला मतदारसंघातील पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याची जबाबदारी मंत्री छगन भुजबळ यांनी पुतणे व माजी खासदार समीर भुजबळ यांच्याकडे सोपवली आहे. त्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून समीर भुजबळ यांनी येवल्यात मुक्काम ठोकत विविध भागांत बैठका, कार्यकर्ता मेळावे आणि पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करून संघटन विस्तारावर भर दिला आहे. (Maharashtra Politics)
‘या’ नेत्यांसह अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
या पक्षप्रवेश सोहळ्यात शिवसेनेचे माजी नगरसेवक दयानंद जावळे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे ज्ञानेश्वर खैरमोडे, भाजपचे कुणाल भावसार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे सागर नाईकवाडे यांच्यासह विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली. (Maharashtra Politics)
समीर भुजबळ काय म्हणाले?
यावेळी बोलताना समीर भुजबळ म्हणाले, “येवल्याच्या विकासाला गती देण्यासाठी आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार तसेच मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होत आहेत. वाढता जनाधार आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांमध्ये पक्षाला निश्चितच मोठे यश मिळवून देईल. येवला तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा अधिक जोमाने फडकेल, असा आम्हाला विश्वास आहे.” (Maharashtra Politics)
राजकीय चर्चांना उधाण
या मोठ्या पक्षप्रवेशानंतर येवला तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनात्मक आघाडी मजबूत केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (Maharashtra Politics)
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, संभाजी पवार, वसंत पवार, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, दत्ता निकम, दीपक लोणारी, मोहन शेलार, देविदास निकम, राजेश भांडगे, निसार लिंबूवाले, ज्ञानेश्वर दराडे यांच्यासह पक्षाचे नगरसेवक, शहर व तालुका पदाधिकारी आणि विविध सेलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Maharashtra Politics)






