Uddhav Thackeray meet Ghosalkar – महाराष्ट्रामध्ये आणखी एका गोळीबार प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाला. तीन गोळ्या लागल्याने गंभीर जखमी झालेले घोसाळकर यामध्ये मृत्युमुखी पडले.
या घटनेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाच्या नेत्यांकडून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतंय. देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही विरोधकांनी केली आहे. अशातच उद्धव ठाकरे घोसाळकर कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी दहिसर येथे पोहोचले आहेत.
उद्धव ठाकरे यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे व आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण? । Uddhav Thackeray meet Ghosalkar
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गुरुवारी गोळीबार झाला . घोसाळकर यांना तीन गोळ्या लागल्या. प्राप्त माहितीनुसार, घोसाळकर यांच्यावर झालेला गोळीबार हा पैशांच्या वादातून झाला होता. मॉरिस नोरोऱ्हा असे गोळ्या झाडलेल्या इसमाचे नाव आहे. त्यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे.
ठाकरे गटातील नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया
संजय राऊत यांनी या प्रकरणावरून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी हल्लेखोर मॉरिस नोरोन्हा याला आपल्या गटात सामील होण्याची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला आहे. | Sanjay Raut on Ghosalkar
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, पक्ष फोडाफोडी, सुडाचं राजकारण आणि तपास यंत्रणांचा गैरवापर यातून देवेंद्र फडणवीस यांनी बाहेर यावं. | Sushama Andhare on Ghosalkar
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात क्राईम रेट वाढतो, फडणवीस हे गृहमंत्री म्हणून अपयशी ठरले असल्याचे त्या म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या
Chhagan Bhujbal : “गृहमंत्री यात काय करू शकतात?” ; अभिषेक घोसाळकर प्रकरणी छगन भुजबळ यांचा सवाल
अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर शिंदे सरकारने कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी घेतला मोठा निर्णय