abhishek ghosalkar : दहिसर येथील माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर बेछूट गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. घोसाळकर यांच्यावर मॉरिस नोरोन्हा या इसमाने पाच गोळ्या झाडल्या. यापैकी तीन गोळ्या घोसाळकर यांना लागल्या असून त्यांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. घोसाळकर यांच्यावर दहिसर येथील करुणा रुग्णालयात उपचार सुरु होते.अशात आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मात्र याप्रकरणी राज्य सरकारवर खोचक टीका केली.
अशात आता कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून विरोधक राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
शस्त्र परवानाधारक त्यांच्याकडील शस्त्रांचा दुरुपयोग करत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे पोलीस शस्त्र परवानाधारकांना बोलावून त्यांची चौकशी करणार आहेत. त्याचबरोबर मॉरिस नोरोन्हा याने अभिषेक घोसाळकर यांच्याहर हल्ला करण्यासाठी वापरलेलं पिस्तुल अवैधरित्या खरेदी केलं होतं, अशी माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी मॉरिसला कोणताही शस्त्र परवाना दिला नव्हता, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
याप्रकणी आता शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेत सांगितले की,’मुख्यमंत्री या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालत आहेत. राज्यात ज्यांच्याकडे शस्त्रं आहेत त्यांची आता चौकशी होणार आहे. ही शस्त्रं परवान्यासह बाळगली आहेत की, परवान्याशिवाय, याचा तपास केला जाईल, चौकशी होईल. मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले आहेत.’