Moshi News : इंद्रायणी नदीला महापूर! चिंबळी-मोशी बंधारा धोक्यात; दोन्ही बाजूंचा भराव वाहून गेल्याने वाहतूक पूर्णपणे बंद
Moshi News : गेल्या आठवड्यापासून पुणे जिल्हा, मावळ पट्टा आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला भीषण महापूर आला आहे.

Moshi News : गेल्या आठवड्यापासून मुंबईसह मावळ पट्ट्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठा महापूर आला आहे. या पुराच्या पाण्याचा प्रचंड फटका चिंबळी-मोशी हद्दीतून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीवरील के. टी. (कोल्हापूर पद्धतीचा) बंधाऱ्याला बसला आहे. (Moshi News)
पुराचे पाणी बंधाऱ्यावरून वाहिल्यामुळे या ४० वर्षे जुन्या बंधाऱ्याचे मोठे नुकसान झाले असून, तो सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने या बंधाऱ्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. (Moshi News)
भराव वाहून गेला, बंधाऱ्याला पडल्या भेगा
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुमारे ४० वर्षांपूर्वी या बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, यावेळच्या भीषण पुरामुळे बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूंचा मातीचा भराव पूर्णपणे वाहून गेला आहे. तसेच, पाण्याच्या प्रचंड दाबामुळे बंधाऱ्याला ठीकठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत. (Moshi News)
Indrayani River: प्रशासनाला जमले नाही; पावसाने स्वच्छ केली इंद्रायणी…..
मोऱ्यांमध्ये अडकली झाडेझुडपे
पुराच्या प्रवासासोबत वाहून आलेली मोठी झाडे, झुडपे आणि कचरा बंधाऱ्याच्या मोऱ्यांमध्ये (पाणी वाहून जाण्याच्या गाळ्यांमध्ये) अडकले आहेत. यामुळे पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत असून, बंधाऱ्यावरील पाण्याचा दाब आणखी वाढला आहे. बंधारा केव्हाही खचण्याची भीती निर्माण झाल्याने स्थानिक प्रशासनाने तात्काळ पावले उचलत या मार्गावरील वाहतूक थांबवली आहे. (Moshi News)
ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी
हा बंधारा चिंबळी आणि मोशी परिसरातील गावांना जोडणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे. वाहतूक बंद झाल्याने वाहनचालक आणि ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि संबंधित प्रशासनाने तातडीने या बंधाऱ्याची पाहणी करावी. (Moshi News)






