Maharashtra Politics : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंना धक्क्यांवर धक्के सुरूच; बड्या महिला नेत्याने सोडली साथ; हजारो कार्यकर्त्यांसह आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
Maharashtra Politics : सचिन अहिर यांच्या पक्षांतराचा धक्का ताजा असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्षाला उत्तर महाराष्ट्रात सर्वात मोठे भगदाड पडले आहे.

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडत असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, आज मुंबईत त्यांच्या पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे. (Maharashtra Politics)
मिळालेल्या माहितीनुसार, शुभांगी पाटील या धुळे जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्या अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. (Maharashtra Politics)
गेल्या काही दिवसांपासून शुभांगी पाटील यांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा सुरू होती. सुरुवातीला त्यांनी या चर्चांना नकार दिला होता. मात्र, आता त्यांनी अखेर शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. (Maharashtra Politics)
पक्षप्रवेशाबाबत बोलताना शुभांगी पाटील म्हणाल्या की, “उद्धव ठाकरे साहेबांबद्दल माझ्या मनात कोणतीही नाराजी नाही. मात्र, हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे मी हा निर्णय घेतला आहे.” (Maharashtra Politics)
दरम्यान, ठाकरे गटासाठी हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी पक्षाचे सहा खासदार शिंदे गटात दाखल झाले होते. त्यानंतर विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. आता शुभांगी पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटातील आणखी नेते शिंदे गटात जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. (Maharashtra Politics)

शिंदे गटाने खासदारांच्या प्रवेशानंतर जाहीर केलेल्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहिमेला या घडामोडीमुळे आणखी बळ मिळाल्याचे मानले जात आहे. आगामी काळात ठाकरे गटातील आणखी काही पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी पक्षांतर करू शकतात, अशीही चर्चा सुरू आहे. (Maharashtra Politics)
Uddhav Thackeray : राम मंदिर दान घोटाळ्यावर उबाठा गट आक्रमक! उद्धव ठाकरेंकडून मोठी घोषणा





