Uddhav Thackeray : राम मंदिर दान घोटाळ्यावर उबाठा गट आक्रमक! उद्धव ठाकरेंकडून मोठी घोषणा
Uddhav Thackeray : आंदोलनाची अधिकृत घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

Uddhav Thackeray : अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिरातील कथित दान घोटाळा प्रकरणी राजकारण चांगलचं तापलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी अयोध्या पोलिसांकडून सुरू असून, आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून विविध पैलू देखील तपासले जात आहेत.
या प्रकरणात मोठे धागेदारे समोर येतील असे बोलले जात असतानाचा आता या मुद्यावर शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाने राम मंदिरातील अपहार प्रकरणी राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनाची अधिकृत घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
या आंदोलनाचा भाग म्हणून ठाकरे गटाकडून राज्यभरातील प्रमुख राम मंदिरे आणि हनुमान मंदिरांमध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची सुरुवात दादर पश्चिम येथील हनुमान मंदिरातील ‘रामरक्षा महाआरती’ने होणार आहे. (Uddhav Thackeray)
या आंदोलनात ज्यांना ज्यांना सहभागी होता येईल त्यांनी सहभागी व्हावी असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच राम मंदिरातील अपहार प्रकरणाचा जाहीरपणे निषेध व्यक्त करत भाजपवर उद्धव ठाकरेंनी टीका केली.
जे मंदिर लूटताहेत त्यांना हिंदू माफ करणार नाही, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. रविवारी ५ जुलै रोजी होणाऱ्या या आंदोलानाची सुरुवात मुंबईत होणार असून नंतर त्याला राज्यव्यापी त्यानंतर देशभरात स्वरुप देणार असल्याची मोठी घोषणा देखील करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले? (Uddhav Thackeray)
Uddhav Thackeray : राम मंदिर दान घोटाळ्यावर उबाठा गट आक्रमक! उद्धव ठाकरेंकडून मोठी घोषणा
भारतीय जनता पक्षाचं जे मूळ आहे त्यामध्ये आम्ही देखील सहभागी होतो ते म्हणजे राम मंदिर. राम मंदिरासाठी झालेल्या आंदोलनात अनेक शिवसैनिक देखील सहभागी होते. देशातील तमाम हिंदू देखील सहभागी झाला होता. तो काळ आजही अनेकांना आठवत असेल. आता राम मंदिराचा मुद्दा एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चिला जात आहे हे दुर्देवी असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. अॅापरेशन राम मंदिर भाजप करता आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.





