Uddhav Thackeray : ‘ मी अमित शाहांबरोबर अयोध्येला जाणार’; उद्धव ठाकरेंचं सर्वांत मोठं विधान
Uddhav Thackeray : या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी एक मोठं वक्तव्य केलं.

Uddhav Thackeray : अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिरातील कथित दान घोटाळा प्रकरणी राजकारण चांगलचं तापलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी अयोध्या पोलिसांकडून सुरू असून, आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून विविध पैलू देखील तपासले जात आहेत. ठाकरे गटाने राम मंदिरातील अपहार प्रकरणी राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार आहे. या आंदोलनाची अधिकृत घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी एक मोठं वक्तव्य केलं. ज्यामुळे पत्रकार परिषदेत काहीवेळ शांतता पसरली. एका पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी मी नक्की अमित शाहांबरोबर अयोध्येत जाणार असं म्हटलं.
पत्रकाराचा प्रश्न : रामरक्षा आंदोलन जे सुरू करत आहात हे आंदोलन मुंबई महाराष्ट्रापुरते मर्यादित असणार का की देशव्यापी असेल? यावर तुम्ही स्वतः अयोध्येत जाणार आहात का?
उद्धव ठाकरे म्हणाले मी नक्की अमित शाहांबरोबर अयोध्येला जाणार…. यानंतर काही वेळ शांतता पसरली. पुढं उद्धव ठाकरे म्हणाले, ” राममंदिरासाठी देशभरात आंदोलन छेडण्यात आले होते. या आंदोलनात शिवसेना प्रमुख स्वतःराज्यभर फिरले. जे मंदिर लुटताहेत त्यांना हिंदू कधीही माफ करणार नाही. हिंदूंचा बुरखा घालून जे राम मंदिर लुटताहेत ते देशद्रोह करताहेत.” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. (Uddhav Thackeray)
उद्धव ठाकरेंचा इशारा म्हणाले… (Uddhav Thackeray)
जसं एकदा अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते की अब हिंदू मार नही खायेगा, तसे मी म्हणतोय की, मंदिर लुटारूंना अब हिंदू माफ नहीं करेगा. जे जे मंदिर लुटत आहेत त्यांना हिंदू त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. त्याची सुरुवात आम्ही येत्या रविवारपासून करतो आहोत, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरेंकडून मोठी घोषणा
राम मंदिराच्या निधीवर भाजपने दरोडा टाकल्याचा थेट आरोप करत उद्धव ठाकरे यांनी भाजपविरोधात रणशिंग फुंकले आहे. या लुटीचा जाब विचारण्यासाठी येत्या रविवारी (दि. ५ जुलै) दादर येथील हनुमान मंदिराजवळ भव्य ‘रामरक्षा’ आंदोलन करण्यात येणार आहे याची घोषणा आज झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी केली.
हेही वाचा : Uddhav Thackeray : राम मंदिर दान घोटाळ्यावर उबाठा गट आक्रमक! उद्धव ठाकरेंकडून मोठी घोषणा






