ऊरळी कांचन | चोरट्यांकडून एटीएम यंत्राची तोडफोड
Updated On:

पुणे (प्रतिनिधी) : ऊरळी कांचन परिसरातील एका बँकेच्या एटीएम यंत्राची तोडफोड करून चोरट्यांनी रोकड लांबविण्याचा प्रयत्न केला. याबाबत लातूर अर्बन बँकेच्या ऊरळी कांचन शाखेच्या व्यवस्थापक विद्याावती चवळे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुणे-सोलापूर रस्त्यावर ऊरळी कांचन परिसरात लातूर अर्बन बँकेची शाखा आहे. शाखेच्या आवारात एटीएम केंद्र आहे.
चार दिवसांपूर्वी मध्यरात्री चोरटे बँकेच्या एटीएम केंद्रात शिरले. चोरट्यांनी एटीएम यंत्राची तोडफोड करून रोकड लांबविण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे तपास करत आहेत.





