Pune District : आळेफाटा पोलिसांनी चोरांचा पाठलाग करत ठोकल्या बेड्या

बेल्हे – आळेफाटा पोलिसांच्या तत्परतेमुळे बँकेत पाळत ठेवून बॅग लेफ्टींग करणारे सराईत आंतर राज्यातील आरोपी चोरी करून पळून जात असताना रंगेहात पकडत ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त.
याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.२२ ऑगस्ट रोजी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास आळे (ता.जुन्नर) येथील अभिषेक वसंत माळवे काळ्या रंगाची हॅन्ड बॅग घेऊन बँकेत गेले होते. बँकेतील आर्थिक व्यवहार संपल्यानंतर ते त्यांचे मारूती स्विफ्ट (एम.एच १४ जी.ए ३१९३) कारध्ये बसून शेजारच्या सिटवर हॅन्डबॅग ठेवून घरी गेले,
घरासमोर गाडी लावून घरात गेलेले पाहून आरोपींनी गाडीची काच फोडून बॅग चोरी केली. यावेळी आळेफाटा पोलिसंनी त्यांना बॅक ऑफ महाराष्ट्र, आळेफाटा बँकेच्या बाहेर होंडा शाईन दुचाकी (एम.एच १७ सी.ई ०३६३) सह दोघांच्या हालचाली संशयीत वाटतल्याने त्यांचा पाठलाग करून पकडले.
गुंजा हनूमंधू (वय २२, रा. अलीमडगू, जि. नेलोरे आंध्रप्रदेश), माधव सुंदरम गोगला (वय ३८, रा. कपरालतीप्पा, जि.नेलोरे, आंध्रप्रदेश) अशी अटक केलेल्यांचे नावे आहेते. आरोपींची पोलीस कस्टडीत अधिकची चौकशी करता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडून ४० हजार रुपयांची होंडा शाईन दुचाकी व २५ हजार आणि ६५ हजार रूपये रोख रक्कम जप्त केली आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे पोलीस हवालदार विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित मालुंजे, भिमा लोंढे, नवीन अरगडे, ओंकार तुणे, गणेश जगताप यांनी ही कारवाई केली.





