UAE vs QAT : यूएईचा टी-२० मध्ये नवा पराक्रम! १० फलंदाज रिटायर्ड आऊट करत रचला इतिहास!

UAE vs QAT UAE team retired out against Qatar : शनिवारी बँकॉकमध्ये महिला आशिया टी-२० विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेत यूएई आणि कतार आमनसामने आले होते. या सामन्यात यूएईने १६ षटकांत एकही विकेट न गमावता १९२ धावा काढल्यानंतर आपल्या सर्व १० फलंदाजांना रिटायर्ड आऊट केले. पुरुष किंवा महिला टी-२० सामन्यात एखाद्या संघाने आपल्या सर्व १० फलंदाजांना रिटायर्ड आऊट करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
युएईने १६३ धावांनी मिळवला विजय –
यानंतर युएईने कतारला फक्त २९ धावांत गुंडाळून १६३ धावांनी विजय मिळवला. कतारचे ७ फलंदाज आपले खातेही उघडू शकले नाहीत आणि सामना २७.१ षटकांत संपला. कारण युएईच्या आठ फलंदाजांनाही खाते उघडता आले नाही. त्यामुळे या सामन्यात एकूण १५ फलंदाजा शून्यावर (डक आऊट) बाद झाले, जे कोणत्याही महिला टी-२० सामन्यातील सर्वाधिक आहे.
सर्व १० फलंदाज रिटायर्ड आऊट होण्याची पहिलीच वेळ –
A unique tactic from UAE at the Women’s #T20WorldCup Asia Qualifier with 10 batters ‘Retired Out’ in a massive 163-run victory 😲
Check how it all transpired 👇https://t.co/mA95gYToQE
— ICC (@ICC) May 10, 2025
प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, युएईची कर्णधार ईशा ओझा आणि तिची सलामीची जोडीदार तीर्थ सतीश यांनी शतकी भागीदारी केली. ओझाने ११३ आणि सतीशने ७४ धावा केल्या. युएईचा स्कोअर १९२ धावांवर पोहोचताच त्यांनी डाव तिथेच संपवण्याचा निर्णय घेतला. पण, टी-२० मध्ये डाव घोषित करण्याची नियम नसतो. त्यामुळे दोन्ही फलंदाज रिटायर्ड आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर एक एक करून दोन फलंदाज खेळपट्टीवर आले आणि रिटायर्ड आऊट होऊन माघारी परतले. ज्यामुळे युएईचा डाव १९२ धावांवर सर्वबाद झाला.
हेही वाचा – India-Pakistan Tensions : ‘पाकिस्तान जास्त काळ दबाव सहन करु शकणार नाही…’, सौरव गांगुलीच मोठं वक्तव्य
ओझाने ५१ चेंडूत शतक ठोकत टी-२० मधील तिसरे शतक झळकावले. सतीशने ३१ चेंडूत अर्धशतक झळकावले आणि युएईने १४ षटकांत १५० धावांचा टप्पा ओलांडला. ओझाने १४ तर सतीशने ११ चौकार मारले. १६ व्या षटकात ओझाने शेवटच्या चार चेंडूत तीन चौकार मारले. युएईचा १९२ धावांचा स्कोअर महिला टी-२० मधील सर्वोच्च ऑलआउट स्कोअर ठरला.
हेही वाचा – PSL 2025 : पाकिस्तानात भयानक अनुभव; बांगलादेशच्या रिशाद हुसेनचा धक्कादायक खुलासा
या विजयासह, यूएई संघ पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. संघाने दोन्ही सामने जिंकले आहेत आणि त्यांचे चार गुण आहेत. युएईने कतारला हरवण्यापूर्वी मलेशियावर नऊ विकेट्सने विजय मिळवला होता. त्यांचा पुढील सामना १३ मे रोजी बँकॉकमधील त्याच मैदानावर मलेशियाविरुद्ध होणार आहे.





