U23 State A Trophy | तब्बल 20 षटकार अन् 13 चौकार… IPL 2025 आधी समीर रिझवीने ठोकलं झंझावती द्विशतक…

U23 State A Trophy 2024 (Sameer Rizvi) : आयपीएल 2025 पूर्वी समीर रिझवीने झंझावाती द्विशतक झळकावले आहे. आयपीएलच्या शेवटच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या समीर रिझवीने 23 वर्षांखालील राज्य अ ट्रॉफीमध्ये त्रिपुराविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात हा पराक्रम केला. या स्पर्धेत उत्तर प्रदेशचा कर्णधार असलेल्या समीरने 97 चेंडूत 20 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने नाबाद 201* धावा केल्या. (Sameer Rizvi scores double hundred in U23 State A Trophy) विशेष म्हणजे चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने हा पराक्रम केला.
समीरची ही कामगिरी दिल्ली कॅपिटल्ससाठी मोठा दिलासा आहे. दिल्लीने समीरला आयपीएल 2025 साठी 95 लाख रुपयांना विकत घेतले आहे. याआधी, मागील हंगामात म्हणजेच 2024 च्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने समीरला 8.4 कोटी रुपयांना विकत घेतले होते.
2️⃣0️⃣1️⃣* runs
9️⃣7️⃣ balls
2️⃣0️⃣ Sixes
1️⃣3️⃣ foursWatch 🎥 highlights of Uttar Pradesh captain Sameer Rizvi’s record-breaking fastest double century in Men’s U23 State A Trophy, against Arunachal Pradesh in Vadodara 🔥#U23StateATrophy | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/WiNI57Tii6
— BCCI Domestic (@BCCIdomestic) December 21, 2024
सर्वात वेगवान द्विशतकाचा केला विक्रम
समीर रिझवीचे द्विशतक हे 23 वर्षांखालील राज्य अ ट्रॉफीमधील सर्वात वेगवान द्विशतक ठरले. समीरने केवळ 97 चेंडूत द्विशतक पूर्ण केले.
उत्तर प्रदेश 152 धावांनी विजयी…
समीर रिझवीच्या स्फोटक शतकामुळे संघाने मोठी धावसंख्या फलकावर लावली. त्रिपुराविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना उत्तर प्रदेशने 50 षटकांत 4 बाद 405 धावा केल्या. कर्णधार समीर रिझवीशिवाय आदर्श सिंग आणि शौर्य सिंग यांनी संघासाठी शानदार अर्धशतके झळकावली. आदर्शने 64 चेंडूत 3 चौकारांच्या मदतीने 52 धावा केल्या, तर शौर्याने 38 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 51 धावा केल्या.
प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना त्रिपुरा संघाला 50 षटकात 9 बाद 253 धावसंख्येपर्यतच मजल मारता आली. त्रिपूराकडून आनंद भौमिकने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि 78 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 68 धावा केल्या. मात्र, त्याची खेळी संघाला विजयाची रेषा ओलांडून देऊ शकली नाही. उत्तर प्रदेशने हा सामना 152 धावांनी जिंकला. या काळात उत्तर प्रदेशकडून कुणाल त्यागीने सर्वाधिक 3 बळी घेतले. याशिवाय वंश चौधरी आणि विजय कुमार यांना प्रत्येकी 2-2 तर शुभमन मिश्रा आणि प्रशांत वीर यांना प्रत्येकी 1-1 यश मिळाले.





