Sameer Rizvi Controversy : क्रिकेटपटू समीर रिझवी आणि ‘ती’च्याबद्दल खळबळजनक पोस्ट! नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
Sameer Rizvi Controversy : क्रिकेटपटू समीर रिझवी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर प्रेझेंटर येशा सागर सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

Sameer Rizvi Controversy and Yesha Sagar relationships Rumors : आयपीएल २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा सदस्य असणारा युवा आणि उदयोन्मुख खेळाडू समीर रिझवी सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याचे नाव प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि प्रेझेंटर येशा सागर हिच्यासोबत जोडले जात आहे. या दोघांनीही आपल्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी सोशल मीडियावर एका कथित पोस्टमुळे खळबळ उडाली आहे.
सोशल मीडियावर खळबळजनक आरोप –
व्हायरल होत असलेल्या सोशल मीडिया पोस्टनुसार, एका आयपीएल क्रिकेटपटूने त्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असलेल्या महिला अँकरला काही विशिष्ट धार्मिक प्रथा पाळण्यासाठी, सोशल मीडियावरील जुने फोटो हटवण्यासाठी आणि वैयक्तिक वर्तनात बदल करण्यासाठी दबाव टाकल्याचा दावा करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर धर्मांतराचाही विषय या पोस्टमध्ये मांडण्यात आला आहे.
🚨 Biggest allegation against Sameer Rizvi for forcing the conversion of his rumored girlfriend Yasa Sagar 😱
This massive report has emerged from sports journalist Abhishek Tripathi. According to the report, a UP cricketer—and by connecting the dots, it is probably Sameer… pic.twitter.com/YXU48pNUoI
— Sonu (@Cricket_live247) April 30, 2026
पत्रकार अभिषेक त्रिपाठी यांनी उत्तर प्रदेशातील एका युवा क्रिकेटपटू आणि महिला अँकरच्या कथित नातेसंबंधाचा उल्लेख करणारी पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर या प्रकरणाशी समीर रिझवी आणि येशा सागर यांची नावे जोडले गेली आहेत. मात्र, हे प्रकरण केवळ अफवा आणि सोशल मीडियावरील चर्चेपुरतेच मर्यादित असून, या दाव्यांना कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
उत्तर प्रदेश के एक मुस्लिम क्रिकेटर का एक हिंदू महिला एंकर (चैनल की नहीं, लीग में एंकरिंग करने वाली) से अफेयर चल रहा है। एंकर की एक दोस्त ने बताया क्रिकेटर कहता है कि जब तक मैं प्रैक्टिस करके आता हूं तब तक आयतें याद कर लो। वो कहता है कि अब तुम किसी क्रिकेटर से हाथ नहीं मिलाओगी।…
— Abhishek Tripathi / अभिषेक त्रिपाठी (@abhishereporter) April 30, 2026
कोण आहे येशा सागर?
येशा सागर हिचा जन्म १४ डिसेंबर १९९६ रोजी लुधियाना, पंजाब येथे झाला. २०१५ मध्ये ती उच्च शिक्षणासाठी कॅनडाला गेली. सेनेका कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने मॉडेलिंग आणि प्रेझेंटर म्हणून करिअरची सुरुवात केली. तिने अनेक प्रसिद्ध पंजाबी म्युझिक व्हिडिओमध्ये काम केले असून, गिप्पी ग्रेवाल आणि परमिश वर्मा यांच्यासारख्या कलाकारांसोबत तिची गाणी खूप गाजली आहेत.





