LSG vs DC : समीर रिझवीची इम्पॅक्टफुल इनिंग! अन् दिल्लीचा लखनौवर ऐतिहासिक विजय; सलग पाचव्यांदा LSG ला चारली धूळ
LSG vs DC : लखनौच्या एकाना स्टेडियमवर गुरुवारी रात्री दिल्ली कॅपिटल्सने आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर घरच्या मैदानात खेळणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला.

LSG vs DC Sameer Rizvi Unbeaten 70 runs IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या पाचव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आपला दबदबा कायम राखत ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. एकाना स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांनी आणि एका युवा ‘इम्पॅक्ट’ खेळाडूने लखनौच्या विजयाचे स्वप्न धुळीस मिळवले. यासह दिल्लीने लखनौविरुद्ध एक खास विक्रमाची नोंद केली आहे.
दिल्लीने सलग पाचव्यांदा लखनौला चारली धूळ –
A SIX TO SEAL IT! 🙌
Sameer Rizvi does it in style 🥳@DelhiCapitals kick off their #TATAIPL 2026 campaign with a 6️⃣-wicket victory 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/lfP7dRNKfg#KhelBindaas | #LSGvDC pic.twitter.com/vVPkz5kqzd
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2026
लखनौच्या एकाना स्टेडियमवर गुरुवारी रात्री दिल्ली कॅपिटल्सने आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या जोरावर घरच्या मैदानात खेळणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. या विजयासह दिल्लीने २०२३ पासून लखनौविरुद्ध सलग पाच सामने जिंकण्याचा आगळावेगळा विक्रम प्रस्थापित केला आहे. १४२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची अवस्था एका वेळी ४ बाद २६ अशी दयनीय झाली होती, पण तिथून समीर रिझवी नावाच्या वादळाने सामन्याचा नूरच पालटला.
दिल्लीच्या गोलंदाजांचा भेदक मारा –
Coming up clutch in the chase 🫡
2⃣nd #TATAIPL FIFTY for Sameer Rizvi 🔥#DC require 36 runs from 36 deliveries.
Updates ▶️ https://t.co/lfP7dRNKfg#KhelBindaas | #LSGvDC pic.twitter.com/RwdBwoyH1m
— IndianPremierLeague (@IPL) April 1, 2026
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा दिल्लीचा निर्णय सार्थ ठरला. लुंगी एन्गिडी आणि टी. नटराजन यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेत लखनौच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. लखनौचा डाव १८.४ षटकात अवघ्या १४१ धावांत आटोपला. अब्दुल समद (३६) आणि मिचेल मार्श (३५) यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण कुलदीप यादवच्या फिरकीने त्यांना जखडून ठेवले.
समीर रिझवी आणि स्टब्सची विक्रमी भागीदारी –
विजयासाठी १४२ धावांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीची सुरुवात अत्यंत खराब झाली. मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर केएल राहुलला बाद केले, तर नितीश राणा आणि अक्षर पटेलही स्वस्तात परतले. अशा वेळी ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून आलेल्या समीर रिझवीने ४७ चेंडूत नाबाद ७० धावांची (५ चौकार, ४ षटकार) खेळी केली. त्याने ट्रिस्टन स्टब्ससोबत (नाबाद ३९) पाचव्या विकेटसाठी ११३ धावांची अभेद्य भागीदारी रचली आणि १७.१ षटकातच संघाला विजय मिळवून दिला.





