IND A vs BAN A : १९४ धावांचा थरार बरोबरीत सुटला! पण सुपर ओव्हरमध्ये भारताचा घात; बांगलादेशचा रोमहर्षक विजय!

IND A vs BAN A Semi Final Highlights : आशिया कप रायजिंग स्टार्स २०२५ स्पर्धेतील पहिला सेमीफायनल सामना भारत-ए आणि बांगलादेश-ए या दोन्ही संघांमध्ये अत्यंत थरारक झाला. रोहा येथे पार पडलेल्या या सामन्यात बांगलादेश-ए संघाने सुपर ओव्हरमध्ये भारताचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे भारत-ए सघाच्या पदरी निराशा आली आहे.
नाणेफेक जिंकून भारताने बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश-ए संघाने २० षटकांत ६ गडी गमावून १९४ धावांचा डोंगर उभारला आणि भारतासमोर १९५ धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात भारताने पण २० षटकांत ६ गडी गमावून १९४ धावांच केल्या, ज्यामुळे सामना टाय झाला आणि निकाल लावण्यासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली.
विजयाच्या उंबरठ्यावर सामना राहिला बरोबरीत –
Mada*chod Har*mkor bhos*diwala Nehal tried more harder than ban players to win game for Bangladesh 🤣
played stinkerof an innings and didn’t even bother to run for 2nd run on last ball
Thanks to dubey Ji and Akbar for their presence of mind🥰 #IndvsBan pic.twitter.com/aGAYsZ79eM— sports addict (@sportsaddictttt) November 21, 2025
बांगलादेश-ए संघाकडून हबीबूर रहमान सोहनने ६५ धावांची दमदार सलामी दिली. शेवटी, मेहरोबने नाबाद ४८ धावांची ताबडतोड फटकेबाजी केली, ज्यामुळे संघाने १९४ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून गुरजपनीतने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. १९५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने चांगली फलंदाजी केली. वैभव सूर्यवंशीने (३८) चांगली सुरुवात करून दिली, तर प्रियांश आर्यने (४४) धावा चोपल्या.
अखेरीस, जितेश शर्मा (३३) आणि नेहाल वढेरा (नाबाद ३२) यांनी भारताला विजयाच्या जवळ नेले. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी १६ धावांची गरज होती. आशुतोष शर्माने चौकार आणि षटकार मारून आशा पल्लवित केल्या, पण २ चेंडूत ४ धावांची गरज असताना तो बाद झाला. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी ४ तर सुपर ओव्हरसाठी ३ धावांची गरज असताना हर्ष दुबेने धावून ३ धावा पूर्ण केल्या आणि सामना बरोबरीत सुटला.
सुपर ओव्हरमध्ये भारताचा पराभव –
सुपर ओव्हरमध्ये भारतीय संघाकडून फलंदाजीला आलेला जितेश शर्मा पहिल्याच चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. यानंतर दुसऱ्या चेंडूवर आशुतोष शर्मा झेलबाद झाला. त्यामुळे बांगलादेशला विजयासाठी फक्त १ धाव करायची होती. बांगलादेशकडून फलंदाजीला आलेल्या यासिर अलीला सुयश शर्माने पहिल्या चेंडूवर बाद केले. पण दुसऱ्या चेंडूवर सुयशने वाईड टाकला. याच चेंडूवर जितेश शर्माकडे स्टंपिंगची संधी होती, पण ती हुकली आणि बांगलादेशने विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.





