Ridhima Pathak Quits : राष्ट्रहित पहिले! रिद्धिमा पाठकने ‘BPL’ची सोडली साथ, भारत-बांगलादेश तणावात मोठा निर्णय

Ridhima Pathak quits BPL for India : भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजनैतिक आणि क्रिकेटमधील संबंध सध्या कमालीचे ताणलेले आहेत. याच पार्श्वभूमीवर, प्रसिद्ध भारतीय स्पोर्ट्स प्रेझेंटर रिद्धिमा पाठक हिने सुरू असलेल्या ‘बांगलादेश प्रीमियर लीग’ (BPL) मधून अचानक बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. रिद्धिमाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यामागचे खरे कारण स्पष्ट केले आहे.
‘मला काढले नाही, मी स्वतःहून बाहेर पडले’ –
गेल्या काही तासांपासून सोशल मीडियावर रिद्धिमा पाठकला बीपीएलच्या होस्टिंग पॅनेलवरून काढून टाकल्याच्या बातम्या व्हायरल होत होत्या. मात्र, या अफवा फेटाळून लावताना रिद्धिमाने सांगितले की, हा तिचा वैयक्तिक निर्णय आहे.
View this post on Instagram
रिद्धिमाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, “गेल्या काही तासांपासून मला बीपीएलमधून काढून टाकल्याच्या चर्चा सुरू आहेत, पण त्यात तथ्य नाही. मी स्वतः या असाइनमेंटमधून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यासाठी माझा देश नेहमीच प्रथम स्थानी असेल. मी अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे आणि निष्ठेने क्रिकेटची सेवा करत आहे आणि कोणत्याही प्रोजेक्टपेक्षा राष्ट्रहित माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.”
हेही वाचा – Shikhar Dhawan Statement : ‘हे सहन केले जाऊ शकत नाही’; बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर शिखर धवन संतप्त
भारत-बांगलादेश क्रिकेट संबंधांत तणाव –
रिद्धिमाचा हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा बीसीसीआय आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड (BCB) यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. या तणावामागची काही प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
- आयपीएलवरील बंदी: बीसीसीआयच्या निर्देशानंतर केकेआरने बांगलादेशी गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला संघातून मुक्त केले. याला प्रत्युत्तर म्हणून बांगलादेश सरकारने त्यांच्या देशात आयपीएलच्या प्रक्षेपणावर बंदी घातली.
- विश्वचषकाचा वाद: २०२६ च्या टी-२० विश्वचषकातील आपले सामने भारताबाहेर हलवण्याची मागणी बीसीबीने केली होती, जी आयसीसीने नुकतीच फेटाळून लावली आहे.
हेही वाचा – ICC Reject BCB : ‘खेळायचं असेल तर भारतातचं खेळा नाहीतर…!’, ICC ने बांगलादेशची मागणी फेटाळली
रिद्धिमा पाठकचे उत्पन्न –
रिद्धिमा पाठक ही क्रीडा विश्वातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार तिची एकूण संपत्ती सुमारे १.८ मिलियन डॉलर (अंदाजे १५ कोटी रुपये). तिला प्रत्येक इव्हेंटसाठी साधारणपणे १०,००० ते १५,००० रुपयांपर्यंत मानधन मिळते. याशिवाय ती ब्रँड एंडोर्समेंट आणि इतर मीडिया प्रोजेक्ट्समधूनही उत्पन्न मिळवते.





