पुणे जिल्हा | लाडकी बहिणचा अडीच कोटी महिलांना लाभ

माळेगाव, (वार्ताहर)- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील अडिच कोटी महिलांना लाभ मिळणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
माळेगाव येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त, नागपंचमीच्या निमित्ताने श्री नागेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक माजी सरपंच दीपक तावरे यांनी चांडाळ चौकडीच्या करामती फेम रामभाऊ जगताप यांच्या माय मिनिस्टर या खास महिलांसाठी आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री तटकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी प्रतिभा तावरे, बारामती उपविभागीय अधिकारी वैभव नावाडकर, बारामतीचे तहसीलदार गणेश शिंदे, माळेगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे, ॲड. गायत्री तावरे, स्नेहलता ठोंबरे, अनिता पाचांगणे, महिला उपस्थित होत्या.
यावेळी महिला उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल मोनिका येळे, उत्कर्षा गावडे, पोलीस दलातील शौनक दुरगुडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक राधा तावरे, सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मणराव भोसले तर प्रणव तावरे यांनी आभार मानले.
माय मिनिस्टर स्पर्धेतील विजेत्या
रामेश्वरी विकास कानतोडे (मानाची पैठणी), तन्वी संतोष जाधव (फ्रिज), शीतल राहुल शिंदे (टिव्ही), पुजा आकाश बनसोडे (नथ), निलम सचिन काटे (चांदीचा करंडा),
सारिका मिलिंद तावरे (ओवन), गौरी रजनीकांत पवार, दीपाली नवनाथ जाधव, राजश्री सुधीर लोणकर (मिक्सर) तर उत्तेजनार्थ सहा हेअर डाय, सहा इस्री, देण्यात आल्या. कार्यक्रमाला महिलांकडून चिट्टी पद्धत काढून सहा मिनी पैठणी साड्या वाटप करण्यात आल्या. प्रत्येक सहभागी महिलेस टिफीन डबा, पर्स यांचे वाटप करण्यात आले.





