Twinkle Khanna Birthday: ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारला मारली लाथ; वाढदिवसानिमित्त अक्षयने दिल्या पत्नीला मजेशीर शुभेच्छा

Twinkle Khanna Birthday : बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असलेले अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे त्यांच्या खोडकर आणि मजेशीर स्वभावासाठी ओळखले जातात. सोशल मीडियावर एकमेकांची गंमत उडवण्याची संधी हे दोघेही कधीच सोडत नाहीत.
यंदा ट्विंकल खन्नाच्या 52व्या वाढदिवसानिमित्त अक्षय कुमारने तिच्यासाठी एक भन्नाट आणि हटके पोस्ट शेअर केली असून ती सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.
अक्षयने शेअर केला मजेशीर फोटो
वाढदिवसाच्या दिवशी अक्षय कुमारने ट्विंकलचा एक कधीही न पाहिलेला फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ट्विंकल अक्षयला जोरात लात मारताना दिसत आहे, तर अक्षय एका हाताने तिचा पाय धरलेला आहे. हा फोटो दोघांमधील मस्त केमिस्ट्री दाखवतो.
View this post on Instagram
कॅप्शनही तितकंच मजेशीर
हा फोटो शेअर करताना अक्षयने एक भन्नाट कॅप्शन लिहिलं आहे. तो म्हणतो, “प्रत्येक अॅक्शन हिरोमागे एक अशी बायको असते, जी फक्त एका नजरेनं किंवा एका लाथेनं त्याला नॉकआउट करू शकते. मिसेस फनीबोन्स, आजही तू मला कोणत्याही स्टंटपेक्षा जोरात मारतेस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… लव्ह यू!” अक्षयचा हा अनोखा अंदाज चाहत्यांना खूपच आवडत असून कमेंट्समध्ये ट्विंकलला भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
अक्षय कुमारचा वर्कफ्रंट
कामाच्या बाबतीत अक्षय कुमार सध्या खूपच व्यस्त आहे. त्याने नुकतेच त्याच्या आगामी कॉमेडी चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’चे शूटिंग पूर्ण केले असून, ख्रिसमसच्या निमित्ताने या चित्रपटाचा फर्स्ट लूकही प्रदर्शित झाला आहे.
याशिवाय त्याच्या येणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘हेरा फेरी 3’, ‘भूत बंगला’ आणि ‘हैवान’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे. 2026 मध्ये अक्षय कुमारच्या 4 ते 5 चित्रपटांचे रिलीज अपेक्षित आहे.





