Akshay Kumar : अक्षय कुमार एलियन थ्रिलरमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार; खास ठिकाणी होणार शुटींग
Akshay Kumar : 'समुक' हा वेगळ्या विषयावर आधारित प्रोजेक्ट

Akshay Kumar : अभिनेता अक्षय कुमार एका अनोख्या एलियन थ्रिलरमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या आगामी ‘समुक’ या सिनेमाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
‘द केरळ स्टोरी’चे निर्माते विपुल अमृतलाल शाह या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तर कनिष्क वर्मा या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. अक्षय येत्या २३ तारखेपासून लंडनमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
Donald Trump: इराणची ट्रम्प यांना भीती! ट्रम्प यांचा गुप्त विमानप्रवास; एअर फोर्स वनचा केला ‘दिखावा’
सिनेमाचं जवळपास ९० टक्के शूटिंग लंडनमध्ये केलं जाणार असून, उर्वरित भाग मुंबईत चित्रीत केला जाणार आहे. निर्माते हे शूटिंग सलग शेड्यूलमध्ये पूर्ण करण्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे. ‘समुक’ हा भारतीय सिनेमातील तुलनेने वेगळ्या विषयावर आधारित प्रोजेक्ट असणार आहे.
या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक टीमचीही साथ मिळणार आहे. क्रिएचर इफेक्ट्ससाठी एलेक गिलिस, तर अॅक्शनसाठी ल्यूक टंबर यांचा सहभाग असल्याचं सांगितलं जात आहे.
अक्षय आणि विपुल अमृतलाल शाह यांनी यापूर्वी ‘आंखें’, ‘वक्त: द रेस अगेंस्ट टाइम’, ‘नमस्ते लंडन’, ‘सिंग इज किंग’ आणि ‘अॅक्शन रिप्ले’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
तर अक्षयच्या ‘सिंग इज किंग’ या चित्रपटाची निर्मिती विपुल शाह यांनीच केली होती. आता दोघेही पुन्हा एकदा अभिनेता-निर्माता म्हणून एकत्र आले असून, यावेळी ते वेगळ्या कथेवर काम करत आहेत ज्यावर हिंदी सिनेसृष्टीत खूप कमी चित्रपट बनले आहेत. Akshay Kumar
अक्षयच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच ‘हैवान’मध्ये नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय आर. डी. बर्मन यांच्या बायोपिकसाठीही त्याचं नाव चर्चेत आहे.
तसेच ‘गोलमाल ५’मध्येही अक्षय दिसणार असल्याची अधिकृत घोषणा यापूर्वीच झाली आहे. आता अक्षयला एलियन थ्रिलरच्या विश्वात पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच २०२७ मध्ये प्रदर्शित होणार आहे. Akshay Kumar
हेही वाचा:
World Elephant Day 2026: हत्तींचे कळप पाहायचेत? कर्नाटकातील ‘या’ जंगलाची करा सफर!






