sanjay khan wife | zarine katrak : अभिनेता संजय खान यांच्या पत्नी झरीन कतरक यांचे वयाच्या ८१व्या वर्षी निधन झाले आहे. शुक्रवारी, म्हणजेच ७ नोव्हेंबरच्या सकाळी, त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेनंतर संपूर्ण खान कुटुंब दुःखात बुडाले आहे. १२ जुलै १९४४ रोजी जन्मलेल्या झरीन कतरक या एक भारतीय अभिनेत्री, इंटेरियर डिझायनर आणि कुकबुक लेखिका होत्या. १९६०च्या दशकात त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले. जरी त्या कमी काळासाठी अभिनय क्षेत्रात सक्रिय होत्या, तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने सर्वांना प्रभावित केले. नंतर त्यांनी प्रसिद्ध अभिनेता संजय खान यांच्याशी लग्न केले. झरीन यांचा जन्म बेंगळुरूतील पारशी कुटुंबात झाला होता. त्यांनी कॉलेजपर्यंत शिक्षण घेतले नव्हते, पण क्रिएटिव्हिटी आणि बिझनेस या क्षेत्रांत त्यांनी लवकरच आपला ठसा उमटवला. अभिनेत्री म्हणून आणि संजय खान यांच्या पत्नी म्हणून झरीन यांना विशेष ओळख मिळाली. १९६३ साली त्यांनी ‘तेरे घर के सामने’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला. तीन वर्षांनंतर त्यांनी संजय खान यांच्याशी विवाह केला. त्यानंतर त्यांनी ‘एक फूल दो माली’ या चित्रपटात कॉस्ट्यूम डिझायनर म्हणूनही काम केले होते. संजय आणि झरीन यांची लव्ह स्टोरी : संजय आणि झरीन यांची पहिली भेट बसस्टॉपवर झाली होती. पहिल्याच भेटीत दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. अखेर १९६६ साली त्यांनी लग्नगाठ बांधली आणि तेव्हापासून ते दोघे आयुष्यभर एकमेकांसोबत राहिले. त्यांनी आपल्या मुलांनाही सुंदर आणि स्थिर जीवन दिले. झरीन यांचा शेवटचा वाढदिवस : यंदाच जुलै महिन्यात झरीन यांनी धूमधडाक्यात आपला वाढदिवस साजरा केला होता. त्यावेळी मुलगी सुजैन खान हिने आईच्या काही खास छायाचित्रांसह इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. सुजैनने लिहिले होते, “मामा मिया, तुम्ही किती सुंदर आहात! माझ्या ब्यूटीफुल मम्मीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी जे काही करते, ते तुमच्या शिकवणीनुसार करते आणि तेच माझ्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट आहे. मी भाग्यवान आहे की मी तुमची मुलगी आहे. युनिव्हर्स तुम्हाला सदैव सुरक्षित ठेवो, जेणेकरून तुम्ही सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत राहाल.” दरम्यान, झरीन कतरक यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीतून दुःखाची लाट उसळली आहे. अनेक कलाकार आणि मित्रपरिवार त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करत आहेत.