Twinkle Khanna | बॉलीवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना पुन्हा एकदा तिने केलेल्या विधानामुळे चर्चेत आली आहे. सध्या ट्विंकल आणि अभिनेत्री काजोल ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या शोचे सूत्रसंचालन करत आहे. या शोमध्ये बॉलीवूडचे लोकप्रिय कलाकार हजेरी लावतात. या चॅट शोमधील एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ट्विंकल रिलेशनशिपबद्दल बोलताना दिसत आहे. नुकतीच या शोमध्ये फराह खान आणि अनन्या पांडे यांनी हजेरी लावली होती. यावेळी ‘दिस साइड, दॅट साइड’ या सेगमेंटमध्ये ट्विंकल, काजोल, फराह आणि अनन्याला प्रश्न विचारला गेला की, ‘वयस्कर लोक हे तरुणांपेक्षा त्यांचे अफेअर्स उत्तमरित्या लपवतात.’ या वाक्यावर त्यांना सहमती किंवा असहमती दाखवायची होती. यावर अभिनेत्री ट्विंकल खन्ना, फराह खान आणि अनन्या पांडे यांनी या वाक्यावर सहमती दर्शवली. त्यानंतर अनन्या म्हणाली की, ‘तुम्ही सगळे खूप चांगले आहात.’ त्यावर ट्विंकल म्हणाली की, ‘वयस्कर लोकांना त्यांचे प्रेमसंबंध लपवण्याचा खूप सराव असतो.’ काजोलने यावर असहमती दर्शवली. ती म्हणाली की तरुणांना त्यांच्या आयुष्याबद्दल, अफेअर्सबद्दल उत्तमप्रकारे लपवता येते. यावर अनन्या पांडे म्हणाली, ‘सोशल मीडियामुळे सर्वकाही बाहेर येते. सर्वांना समजते.” फराह खान हा वाद संपवत म्हणाली, तरुण लोक जरी प्रेमात नसले तरी अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करतात.’ ट्विंकल खन्नाने केलेल्या विधानामुळे वाद काही दिवसांपूर्वी ट्विंकल खन्नाने केलेल्या विधानामुळे, वाद निर्माण झाला होता. गेस्ट्स करण जोहर आणि जान्हवी कपूर यांच्यासोबत इमोशनल चीटिंग वि. फिजिकल चीटिंग या चर्चेदरम्यान सर्वांनी सांगितले की इमोशनल वाईट आहे, पण ट्विंकलने फिजिकलला ‘रात गई बात गई’ म्हणत सर्वांना आश्चर्यचकित केले होते. Twinkle Khanna | हेही वाचा: “जंगलराजमध्ये राहणारे स्वतःला सम्राट मानत होते” ; पंतप्रधान मोदींचा लालू प्रसाद यादवांवर टीका