Ravindra Dhangekar : खलील शेख प्रकरणामुळे अडचणी वाढल्या! रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल
Ravindra Dhangekar : यानंतर आता रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी प्रतिभा धंगेकर दोघेही अज्ञातस्थळी गेले असून नॉट रिचेबल झाले आहेत.

Khalil Shaikh Suicide : बांधकाम व्यावसायिक खलील शेख (Khalil Shaikh Suicide) आत्महत्याप्रकरणात माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पोलिसांनी आत्महत्याप्रकरणात धंगेकर पती-पत्नीनवर गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी याप्रकरणात अटकेची शक्यताही बोलून दाखवली होती. यानंतर आता रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी प्रतिभा धंगेकर दोघेही अज्ञातस्थळी गेले असून नॉट रिचेबल झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र धंगेकर आणि प्रतिभा धंगेकर हे सध्या अज्ञातस्थळी असून या दोघांनी अटकपूर्वक जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. दोघांच्या शोधसाठी पुणे पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे. सोमवारी धंगेकर दाम्पत्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी पोलिसांनी अटक करु नये म्हणून सध्या रवींद्र धंगेकर आणि त्यांची पत्नी अज्ञातस्थळी गेले आहेत.
एकूण १४ जणांविरोधात गुन्हा दाखल
बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी व्हिडिओ तयार करून गळफास घेत आत्महत्या केली होती. यामध्ये त्यांनी रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर, मनसेचे माजी नगरसेवक बाळा शेडगे, त्यांच्या पत्नी वर्षा शेडगे यांच्यासह अनेकांना आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरले होते. यानंतर स्वारगेट पोलीस ठाण्यात माजी आमदार धंगेकरांसह १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
कोण होता खलील शेख?
खलील शेख हा बांधकाम क्षेत्रातील लेबर कॉन्ट्रॅक्टर होता. त्याने एक व्हिडिओ शेअर करत गळफास घेत आपलं जीवन संपवलं. ज्या इमारतीत आत्महत्या केली, त्या इमारतीच्या बाहेरील भिंतीवर त्याने एक चिठ्ठी चिकटवली होती. तसेच, आणखी एक चिठ्ठी त्याच्या खिशातही आढळून आली.
तणाव असह्य झाला अन्…
मिळालेल्या माहितीनुसार, खलील शेख २०११ पासून पुण्यात बांधकाम क्षेत्रात कार्यरत होता. तो संबंधित आरोपींकडे सेंट्रिंगचे काम करत होता. हे काम पूर्ण करण्यासाठी त्याने बाहेरून व्याजाने पैसे उचलले होते. कामाचे पैसे व्याजासह परत देण्याचे आश्वासन संबंधितांनी दिले होते. मात्र, वारंवार मागणी करूनही पैसे न मिळाल्याने खलील शेख मानसिक तणावाखाली होता. हा तणाव असह्य झाल्याने त्याने टोकाचं पाऊल उचलतं आत्महत्या केली.
दरम्यान, या प्रकरणात समोर आलेल्या माहितीनुसार, उत्कर्ष असोसिएट्स या फर्ममध्ये माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी, बाळा शेडगे आणि रघू गौडा यांच्या पत्नी या भागीदार आहेत.
Pritam and Pedro: ‘प्रीतम अँड पेड्रो’चा दुसरा सीझन येणार; प्रेक्षकांच्या प्रतिसादानंतर निर्णय





