Ashadhi Wari 2026 : कला शिक्षकाने साकारली ब्रशच्या टोकावर विठ्ठल मूर्ती !
येळाणे (ता. शाहूवाडी) येथील कला शिक्षक केवल यादव यांना चित्र काढण्याच्या ब्रशच्या मागील टोकावर कोरीव काम करुन विठ्ठलाची मूर्ती साकारली आहे.

Ashadhi Wari 2026 : येळाणे (ता. शाहूवाडी) येथील कला शिक्षक केवल यादव यांना चित्र काढण्याच्या ब्रशच्या मागील टोकावर कोरीव काम करुन विठ्ठलाची मूर्ती साकारली आहे. त्यांनी त्या ब्रशवर कटरच्या साह्याने कोरीव काम करत व रंगकाम करत विठ्ठलाची मूर्ती साकारली आहे.
या कलाकृतीसाठी त्यांनी ॲक्रेलिक रंगाचा वापर केला. या कलाकृतीसाठी त्यांना तीन तास वेळ लागला. ब्रशवरील विठ्ठलाच्या सुंदर मूर्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पंढरपूरला येत्या २५ जुलै रोजी विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रातून संत, वारकरी विठूरायाच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवरनिमित्ताने केवल यादव यांनी रेखाटलेली विठ्ठलाची प्रतिमा लक्ष वेधून घेत आहे.





