Pritam and Pedro: ‘प्रीतम अँड पेड्रो’चा दुसरा सीझन येणार; प्रेक्षकांच्या प्रतिसादानंतर निर्णय
Pritam and Pedro: ‘प्रीतम अँड पेड्रो’ रिलीज होताच ही जिओ हॉटस्टारवरील आतापर्यंतची सर्वाधिक पाहिली गेलेली सीरिज

Pritam and Pedro: ‘प्रीतम अँड पेड्रो’ ही वेबसीरिज सध्या जिओ हॉटस्टारवर धुमाकूळ घालत आहे. विशेष म्हणजे राजकुमार हिरानी दिग्दर्शित या सीरिजमधून त्यांचा मुलगा वीर हिरानीने पदार्पण केलं आहे. अर्शद वारसी आणि वीर हिरानी यांची भूमिका असलेली ही वेबसीरिज सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.
जिओ हॉटस्टारवर स्ट्रीम होत असलेली ‘प्रीतम अँड पेड्रो’ ही एक इंडियन सायबर क्राईम कॉमेडी थ्रिलर सीरिज आहे. आता या वेबसीरिजच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज आहे. लवकरच या वेबसीरिजचा पुढचा सीझन येणार आहे.
वेब सीरिजच्या सीक्वलबाबत बोलताना दिग्दर्शक राजकुमार हिरानी म्हणाले, “आम्ही या सीरिजचा सीक्वल बनवण्याचा प्लॅन करत आहोत. सध्या याच्या स्क्रिप्टवर काम सुरू असून, कथा नेमकी कोणत्या दिशेने पुढे घेऊन जायची यावर विचार सुरू आहे. प्रेक्षकांकडून येणाऱ्या मेसेजवरुन एखादा चित्रपट किंवा सीरिज त्यांना किती आवडते आहे, याचा अंदाज येतो.
अनेक लोक स्वतःहून समोरून कौतुक करतात, तेव्हा बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. जेव्हा प्रेक्षकांना एखादी गोष्ट आवडत नाही, तेव्हा ते शांत राहतात. ते संपूर्ण सीरिज किंवा चित्रपटाची चर्चा करत नाहीत. मात्र, या शोच्या बाबतीत प्रेक्षकांचा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा खूप जास्त राहिला आहे.”
‘प्रीतम अँड पेड्रो’ रिलीज होताच ही जिओ हॉटस्टारवरील आतापर्यंतची सर्वाधिक पाहिली गेलेली सीरिज ठरली आहे. हिंदीशिवाय तमिळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली, मराठी आणि कन्नड अशा सहा भाषांमध्ये ही सीरिज ट्रेंड करत आहे. ‘प्रीतम अँड पेड्रो’मध्ये अर्शद वारसी, विक्रांत मॅसी, बोमन इराणी, मोना सिंग आणि वीर हिरानी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
हेही वाचा:
Aaditya Thackeray : लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावर आदित्य ठाकरे भडकले; म्हणाले, “आम्ही आधीपासूनच..”






