Girish Oak : “ट्रोल करणं हा रिकामटेकड्या लोकांचा उद्योग”; सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना गिरिश ओक यांनी चांगलचं सुनावलं
Girish Oak : अभिनेते सचिन पिळगांवकर यांना ट्रोल करणाऱ्यांवर गिरिश ओक यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

Girish Oak : २७ फेब्रुवारी म्हणजेच आज माया चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते गरिश ओक महत्वाची भूमिका साकारत आहेत. चित्रपटाच्या निमित्ताने विविध ठिकाणी चित्रपटातील स्टारकास्टच्या मुलाखती पार पडल्या. एका मुलाखतीत अभिनेते सचिन पिळगांवर यांना ट्रोल केले जाते यावर तुमचे मत काय? असा प्रश्न गिरिश ओक यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर गिरिश ओक यांनी ट्रोलर्संवर जोरदार निशाणा साधला आहे.
“कमेंट करणं, ट्रोल करणं हा रिकामटेकड्या लोकांचा उद्योग आहे. ही चेहरा नसलेली माणसं आहेत. त्यांना काही काम नाही म्हणून ते रिअॅक्ट करतात. वाईट कमेंट करणाऱ्या लोकांमुळे एखादा माणूस खूप डिस्टर्बही होऊ शकतो. दोनशे वाईट आणि एखादी चांगली कमेंट असते…” अशा शब्दांत गिरिश ओक यांनी टोलर्संना फटकारले आहे.
पुढे बोलताना गिरिश ओक असेही म्हणाले की, “आता ज्याप्रकारे सचिन पिळगावकरांबद्दल जे ट्रोलिंग सुरू आहे. काय आहे ते. तो माणूस वयाच्या सातव्या वर्षापासून काम करतोय. त्याच्या आयुष्यात असे अनुभव आलेले असणारच. त्याला तुम्ही काय बोलताय. त्याची खरंच ओळख होती. मीना कुमारीशी, संजीव कुमारशी होती. सगळ्यांशी त्याची ओळख होती. असे अनुभवही आहेत. पण तुम्ही चेष्टाच करायची ठरवली आहे तर वाटेल ते बोलायला लागले आहेत.” अशा शब्दांत त्यांनी ट्रोल करणाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.
“त्याचं वय, त्याचा अनुभव काहीही न बघता तुम्ही ट्रोलिंग करायला लागता. तुम्हाला एक नागरिक म्हणून काहीच वाटत नाही का? असं कोणी कसं काय करू शकतो? असे सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत. या ट्रोल करणाऱ्या लोकांना कळत नाही की खरंच एखादी व्यक्ती जर भावनिक असेल तर काय होऊ शकतं. यांच्या ट्रोलिंगमुळे काहीतरी विचित्रही घडू शकतं”, असेही गिरिश ओक यांनी म्हटले आहे.
ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर मराठी इंडस्ट्रीत महागुरू म्हणून ओळखले जातात. त्यांच्या चित्रपटांची यादी मोठी आहे. मराठीसह त्यांनी अनेर हिंदी चित्रपटात देखील काम केले आहे. मुलाखतींमधून सचिन त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत असताता. पण अनेकदा मुलाखतींमध्ये ते आपले अनुभव शेअर केल्यानंतर त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो.




