Priya Bapat : प्रिया बापट गुडन्यूज देणार? सोशल मीडियावर त्या फोटोमुळे चर्चांना उधाण

Priya Bapat : अभिनेत्री प्रिया बापटने तिच्या इंन्स्टाग्रामवरून फोटो शेअर केला आहे, या फोटोमुळे मोठी चर्चा होत आहे. प्रियाने इंन्स्टावर जो फोटो शेअर केला आहे, तो फोटो पाहून ती प्रेग्नंट असल्याची जोरदार चर्चा होत होती. मात्र, हा फोटो एका सिनेमाच्या प्रोमोशनसाठी असल्याचं आता समोर आलं आहे.
प्रियाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने तिच्या आगामी सिनेमाविषयी अपडेट दिली आहे. प्रिया बापटने सिनेमातील तिचा प्रेग्नंट लूकमधील खास फोटो पोस्ट केला आहे. यामुळे सुरूवातीला प्रिया हिने गुडन्यूज दिली की काय असं वाटलं. मात्र, सिनेमातील एक खास लूकचा हा फोटो असल्याचं समोर आलं आहे.
या पोस्टला प्रियाने खास कॅप्सन दिलं आहे. ‘गाणं पाहिलं का?? चित्रपट येतोय १२ सप्टेंबरला ‘बिन लग्नाची गोष्ट’. या सिनेमातून प्रिया बापट आणि उमेश कामत हे दोघेही अनेक वर्षांनी रुपेरी पडद्यावर दिसणार आहेत. यामुळे या सिनेमातून दोघांची कमेस्ट्री पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.
View this post on Instagram
नात्यांची परिभाषा सांगणारा हा सिनेमा असणार आहे. येत्या १२ सप्टेंबर या दिवशी बिन लग्नाची गोष्ट हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर आणि एक गाण रिलीज झालं आहे. सोशल मीडियावर प्रियाने शेअर केलेल्या पोस्टला लाईक्स आणि कमेंट्स करण्यात आल्या आहेत.
एका नेटकऱ्याने, ‘मला वाटला good news आहे’ आणखी एकाने, प्रिया तू प्रेग्नंट आहेस नक्की, उमेश तूला पण खूप खूप अभिनंदन असं म्हटलं आहे. बिन लग्नाची गोष्ट या सिनेमाच दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी केलं आहे. या सिनेमात गिरीष ओक आणि निवेदिता सराफ यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत.
हेही वाचा : “चीज, ब्रेड ते चॉकलेट…” जीएसटीमधील बदलानंतर कोणते खाद्यपदार्थ स्वस्त झाले?, वाचा संपूर्ण यादी





