Sonam Kapoor : “तुमच्या प्रेमाने या कुटुंबाला….”; सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सोनम कपूरकडून कौतुकाचा वर्षाव
Sonam Kapoor : अभिनेत्री सोनम कपूरने तिची सासू प्रिया आहुजा यांना सोशल मीडियावरुन पोस्ट करत खास पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Sonam Kapoor : बॅालीवूड अभिनेत्री सोनम कपूर ज्येष्ठ अभिनेते अनिल कपूर यांची मुलगी असली तरी तिने इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. सध्या ती फारशी चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी खाजगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. ती नेहमी तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असते.
नुकतीच तिने सोशल मीडियावरून एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सोनमने तिच्या सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोनम कपूर सध्या तिच्या दुसऱ्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. तिने तिची सासू प्रिया आहुजा यांना खास पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
सोशल मीडियावर अभिनेत्रीने एक खास पोस्ट शेअर करत या पोस्टमध्ये कुंटुंबात सासूची भूमिका किती महत्वाची आहे, याचा उल्लेख करत सासू प्रिया आहुजा यांना वाढदिवसाच्या खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत.
सोनम कपूरने (Sonam Kapoor) इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यामधील एका फोटोमध्ये ती तिची सासू प्रिया आहुजा आणि तिचा पती आनंद आहुजा यांच्यासोबत बसलेली दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये सोनमने “सर्वात गोड आजी आणि आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमच्या प्रेमाने या कुटुंबाला सुंदरपणे एकत्र ठेवले आहे. तुम्ही तुमच्या मुलांना आणि नातवंडांवर ज्या प्रकारे प्रेम करता ते पाहून मला मी किती भाग्यवान आहे याची जाणीव दररोज होते,” अशी भावना सोनमने व्यक्त केले आहे.
पोस्टमध्ये सोनम पुढे म्हणते, “तुमच्या दयाळूपणाबद्दल, तुमच्या ताकदीबद्दल आणि तुमच्या मजबूत उपस्थितीबद्दल धन्यवाद. आम्ही तुमचा वाढदिवस आज आणि नेहमीच साजरा करू. मी तुमच्यावर खूप प्रेम करते. वाढदिवसाच्या शुभेच्छा.”
View this post on Instagram
अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर सोनम कपूर मे २०१८ मध्ये उद्योगपती आनंद आहुजासोबत विवाहबंधनात अडकली. ऑगस्ट २०२२ मध्ये या जोडप्याने त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. त्यांनी त्याचे नाव वायु ठेवले. आता ते त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत, ज्याची घोषणा त्यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये केली होती.






